Thursday, May 23, 2024
Homeनगरबदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडीत करणार

बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या अधिकार्‍यांची सेवा खंडीत करणार

राहाता |प्रतिनिधी| Rahata

बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणार्‍या महसूल विभागातील (Revenue Department) अधिकार्‍यांवर आता कारवाई करुन त्यांची सेवा खंडीत करण्याचा इशारा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिला आहे.

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, महसूल विभागातील बदल्यांची (Revenue Department Transfers) प्रक्रीया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक अधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता विभागाने घेतली असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी सांगितले की, विदर्भ, मराठवाड्यातील 70 टक्के जागा यापूर्वी रिक्त होत्या.

प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर झेडपीत 937 रिक्त जागांसाठी भरती

त्या सर्व जागांवर आता अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतु काही ठिकाणी अधिकारी हजर होत नसल्याने अशा अधिकार्‍यांना आता निलंबनाच्या नोटीसा देण्यात आल्या आहे. त्यांच्या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्यावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

राहुरी (Rahuri) तालुक्यातील उंबरे (Umbare) येथील घटना अतिशय गंभीर असून याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकांना दिले आहेत. याबाबतीतील संपूर्ण माहिती पुढे आणण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. यापूर्वी श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या. त्यावेळी मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. उंबरे (Umbare) येथील घटना पाहता ज्या पोलीस ठाण्याच्या (Police Station) हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना यापुर्वीच दिल्या आहेत. परंतु समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तींबद्दल माहिती देण्याचे आवाहन ना. विखे पाटील (Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले आहे.

नीरव मोदीच्या जमिनीसाठी आ. रोहित पवारांचे आंदोलन

- Advertisment -

ताज्या बातम्या