Thursday, September 19, 2024
Homeनगरविविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन

महसूल कर्मचारी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी काम बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्मचार्‍यांनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी निदर्शने केली.
यावेळी महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष अक्षय फलके, जिल्हा संघटनेचे सरचिटणीस स्वप्निल फलके, उपाध्यक्ष अशोक मासाळ, उपाध्यक्ष संतोष झाडे, मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब निमसे, सुभाष तळेकर, अशोक मासाळ, अक्षय फलके, महिला अध्यक्ष वंदना नेटके, दिगंबर करपे, नितीन मुळे, राजेंद्र लाड, शेखर साळुंखे, भरत गोरे, महेश म्हस्के, शारदा आवटी, रूपाली बधे, अजय ढसाळ, ज्ञानेश्वर खोलम आदीसह महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

सुधारित आकृतिबंध दांगट समितीच्या अहवालातील शिफारसी प्रमाणे कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करावा, अव्वल कारकून मंडल अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात तात्काळ पदोन्नती देऊन आदेश निर्गमित करण्यात यावे, महसूल विभागाचा आकृतीबंध तात्काळ मंजूर करून पुरवठा विभागातील पदभरती मुळे रिक्त होणारे महसूल कर्मचारी यांना महसूल विभागात सामावून घेण्यात यावे, वेतन देयके उणे प्राधिकारपत्रावर वाढवण्याबाबत तात्काळ शासन निर्णय निर्गमित करण्यात यावा, महसूल सहाय्यकांचा ग्रेड पे 1900 वरून 2400 करण्यात यावा तसेच महसूल सहाय्यक व तलाठी यांना सेवा अंतर्गत एकसमान परीक्षा पध्दती लागू करण्यात यावी, महसूल सहाय्यकांची सेवाज्येष्ठता यादी केवळ महाराष्ट्र महसूल अहर्ता परीक्षा नियम 1999 मधील तरतुदीनुसार तयार करण्यात यावी, महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांची सेवा पुस्तिका लेखा अधिकारी वेतन पडताळणी पथकाऐवजी समक्ष असलेल्या महसूल विभागातील नियुक्त लेखा अधिकारी यांच्या वेतन पडताळणीच्या अधिकारामार्फत करण्यात यावी, अव्वल कारकून या संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक महसूल अधिकारी असे करण्यात यावे, नायब तहसीलदार संवर्गाचे गे्रड वेतन 4800 करण्यात यावे, अव्वल कारकून यांना मंडल अधिकारी पदावर अदलाबदली धोरणानुसार पदस्थापना देण्यात यावी, नायब तहसीलदार पदासाठी अव्वल कारकून, मंडल अधिकारी यांच्याकरिता पदोन्नती विभागीय परीक्षा सरळ सेवा करण्यात यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या