Saturday, May 18, 2024
Homeनगरशहाणपण शिकवू नका

शहाणपण शिकवू नका

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे दाखले उदयनराजे भोसले यांच्याकडे मागणार्‍यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, अशा शब्दत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा.संजय राऊत यांना खडसावले आहे.

- Advertisement -

संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना ना. विखे पाटील म्हणाले, हिंदुत्वाचा राजकारणासाठी सोयीस्कर वापर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून आपले इंगित साध्य करणारे आता महाराष्ट्र पेटवू पाहात आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होवूच शकत नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वच पिढ्यांचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील वक्तव्य निश्चितच वेदनादायी आहे, असे स्पष्ट करून या विरोधात उदयनराजे भोसले यांच्या ज्या भावना आहेत त्याच सर्व महाराष्ट्राच्या भावना आहेत. या विषयावर तसेच आमच्या वक्तव्याचे गैरअर्थ काढून काहीजण भांडवल करीत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.

राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा हिंदुत्वाला तिलांजली देणारेच देवभक्ती आणि देशभक्ती दाखविणार्‍यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करीत होते याची आठवण करून देत ना. विखे पाटील म्हणाले, याच सरकारच्या काळात औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली गेली तेव्हा तुमची मनगटे कुठे बांधली गेली होती? तुमचा मर्दपणा तेव्हा कुठे गेला होता, असा सवालही विखे पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या