Friday, May 3, 2024
Homeनगरजनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या; महसूल मंत्री थोरात यांचे नागरिकांना आवाहन

जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्या; महसूल मंत्री थोरात यांचे नागरिकांना आवाहन

अहमदनगर|Ahmedagar

14 दिवसांसाठी लोकांनी घरात थांबावे, करोना बाधितांनी घरामध्ये उपचार न घेता कोव्हिड सेंटरमध्ये दाखल व्हावे,

- Advertisement -

प्रशासनाने निर्बंधाची कडक अंमलबजावणी केली व नागरिकांनी नियमांचे काटेकर पालन केले, तर करोनाची परिस्थिती नियंत्रणात येईल. यामुळे 14 दिवसाच्या जनता कर्फ्यूचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

महसूलमंत्री थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात करोना परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री थोरात बोलत होते. ते म्हणाले, नागरिकांनी 14 दिवसासाठी घरात थांबणे पसंत केले तर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.

ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी मुख्यमंत्री स्वत: पंतप्रधानांकडे पाठपुरावा करत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आहे.

हे सर्व असतानाही याला एकच पर्याय आहे, नागरिकांनी घरामध्ये राहणे पसंत करावे. त्यांना 14 दिवस त्रास होईल, परंतू यानंतर याचा फायदा मिळणार आहे. ऑक्सिजन, इंजेक्शनची गरज भासणार नाही, आज जे नागरिकांचे जीव जात आहे ते वाचतील. यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी जनता कर्फ्यूला प्रतिसाद द्यावा असे आवाहन मंत्री थोरात यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या