Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्र‘रेमडेसिवीर’ वादात महसूलमंत्री थोरातांची उडी, म्हणाले...

‘रेमडेसिवीर’ वादात महसूलमंत्री थोरातांची उडी, म्हणाले…

संगमनेर –

करोना रुग्णांवर उपचारासाठी वापरल्या जाणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनचा एकीकडे तुडवडा असताना ब्रुक फार्मा कंपनीमार्फत रेमडेसिवीरचा महाराष्ट्राला पुरवठा करण्यावरुन जोरदार राजकारण रंगलं आहे.

- Advertisement -

या राजकारणातच ‘रेमडेसिवीर’ अडकले असताना शाब्दिक चकमक सुरु आहे. रेमडेसिवीरचा साठा मुंबईबाहेर पाठवण्याच्या संशयातून ब्रुक फार्मा कंपनीच्या संचालकाला ताब्यात घेवून पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे. यात आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उडी मारली आहे.महसूलमंत्री थोरात हे रविवारी (दि. 18) संगमनेरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

करोनाच्या संकटात राजकारण करू नये, हीच अपेक्षा आमची सगळ्यांची आहे. दुर्दैवाने तेच घडते आहे. अशाच प्रकारची परिस्थिती आहे. राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते दिल्लीला गेले असते, तर तेथून ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शनची महाराष्ट्राला खूप मदत झाली असती. परंतु तो फार्मा कंपनीवाला कुणीतरी त्यांचा कार्यकर्ता आहे. म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात जाणे हे काही फार योग्य नाही. अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या