Thursday, November 21, 2024
Homeनगरहसून दुसर्‍याची जिरविणे याशिवाय दुसरे काय केले?

हसून दुसर्‍याची जिरविणे याशिवाय दुसरे काय केले?

ना.विखे यांचा थोरातांना टोला

राहाता |प्रतिनिधी| Rahata

ठेकेदार आणि माफीयांच्या जीवावर राजकारण करण्यासाठी काही लोकं आपल्या भागात येत आहेत. परंतु या भागातील जनता त्यांना थारा देणार नाही. त्यांच्या तालुक्यातच त्यांची निष्क्रीयता उघड झाली आहे. केवळ हसून दुसर्‍याची जिरविणे एवढेच काम संगमनेरच्या नेत्यांनी आजपर्यंत केले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ.बाळासाहेब थोरात यांना लगावला.

- Advertisement -

मंत्री विखे पाटील म्हणाले की, निळवंडे कालव्याचे पाणी दिलेल्या शब्दाप्रमाणे आणून दाखविले. तरुणांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची उभारणी सुरु झाली. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने ही लोकहिताची कामे करता आली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिर्डीत येवून केलेल्या आरोपांना उत्तर देताना मंत्री विखे पाटील म्हणाले, तुम्ही आमच्याकडे येऊन काही बोलायचे, ती तुमच्यासाठी लोकशाही असते, आम्ही थोडी टीका केली तर लगेच लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप करता, लोकशाही कुठेही धोक्यात नाही, तुमचे पद धोक्यात आले आहे. त्यामुळेच थोड्याशा आरोपांमुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात. वाळू माफीया आणि एंजटांना पुढे करुन, डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार करुन, वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचे आम्ही कधीही समर्थन केले नाही. उलट त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पण ज्या निष्पाप महिलांना मारहाण झाली, त्यांची माफी मागण्याची तुमची दानत नाही.

टोळ्या आणि माफीयांच्या जीवावर राजकारण करुन, दहशत निर्माण करणारा संगमनेरच्या नेत्यांचा चेहरा आता राज्याला दिसला आहे. राहाता तालुक्यातील जनता ही खोट्या भूलथापांना बळी पडणार नाही. गणेश कारखाना चालवायला घेतला म्हणून तो शेतकर्‍यांच्या मालकीचा राहीला. यापुर्वीच तुम्ही घ्यायला पाहीजे होता. संस्थांवर चर्चा करायची असेल तर एकदा समोरासमोर याच, असे आव्हान देवून समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत तुम्ही जिल्ह्याच्या मानगुटीवर बसविले त्याची किंमत मोजावी लागली, असा आरोप ना.विखे यांनी केला.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या