Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूज'त्या' नराधमाचा 'चौरंग' करा…; बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

‘त्या’ नराधमाचा ‘चौरंग’ करा…; बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

- Advertisement -

कोलकात्यात डॉक्टर तरुणीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणाने देश हादरलेला असतानच, दुसरीकडे बदलापूर (Badlapur) शहरातील एका शाळेच्या दोन विद्यार्थिनींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळेत गेलेल्या चिमुकल्या लेकींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हजारो लोक रस्त्यावर उतरले. या घटनेवर अनेक सेलिब्रिटींनी कडक शब्दांत संताप व्यक्त केलाय. या प्रकरणातल्या आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणीही त्याने केली आहे.

हे देखील वाचा : Nashik Sinnar News : साडेचार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपी ताब्यात

मराठी अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) याने बदलापूरच्या प्रकरणावर एक्स अकाऊंटवर या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणावर रितेशने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर रितेश देशमुखने २४ वर्षीय अक्षय शिंदे या आरोपीला (Accused) सर्वात कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे.

हे देखील वाचा : गृहमंत्रीजी, माझी पोलीस सुरक्षा तातडीने हटवा; सुप्रिया सुळेंनी का केली विनंती?

काय म्हंटलंय रितेश देशमुखने?

रितेश देशमुखने लिहिले आहे की, एक पालक म्हणून मी या घटनेने पूर्णपणे वैतागलेलो आणि चिडलेलो आहे. दोन चार वर्षांच्या मुलींवर त्यांच्याच शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला आहे. मुलांना त्यांच्या घराप्रमाणेच शाळा ही अतिशय सुरक्षित जागा वाटायला हवी. या राक्षसाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळात अशा आरोपींना जी कठोरातील कठोर शिक्षा द्यायचे तीच शिक्षा आज या नराधमाला द्या. त्याचा ‘चौरंग’ करा. अशा शब्दात रितेश देशमुखने आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

दरम्यान, रितेशच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्याला समर्थन दिले असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी होताना दिसतेय.

हे देखील वाचा : मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड

काय आहे प्रकरण?

बदलापुरातील अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काल मंगळवारी घटनेचा निषेध करण्यासाठी जनक्षोभ रस्त्यावर उतरला. आदर्श शाळेसमोर पालकांनी आंदोलन केले. त्यानंतर पालक आणि आंदोलक बदलापूर रेल्वे स्थानकात घुसले आणि रेल रोको आंदोलन केले. आंदोलनाची धार एवढी वाढली की, अख्खं बदलापूर आंदोलनात उतरले. आरोपीला जोपर्यंत फाशी होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या