Monday, July 8, 2024
Homeनाशिकरस्त्यांच्या जाळ्यांमुळे नाशिकच्या विकासाला चालना - नितीन गडकरी

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे नाशिकच्या विकासाला चालना – नितीन गडकरी

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

गतिशील विकासाला प्राधान्य देणार्‍या महायुती सरकारने मागील दशकभरात समाजातील प्रत्येक घटकाच्या सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त केला आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते महामार्गाच्या जाळ्यांमुळे सामाजिक आर्थिक विकासाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळाली आहे,असे प्रतिपादन रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ गोदाघाटावर आयोजित सभेत ते बोलत होते.

गडकरी पुढे म्हणाले की, विकासाला प्राधान्य देणारी नाशिकची जनता यावेळीही महायुतीला बहुमतांनी विजयी करेल असा मला विश्वास आहे.कोणतेही सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलू शकत नाही.काँग्रेसने 80 वेळा घटना बदलण्याचे पाप केले आहे.आणि आता तेच आमच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत.सबका साथ सबका विकास हा मंत्र मोदी सरकारचा आहे.भाजपने विविध योजना राबवल्या. त्यात कोणताही भेदभाव केला नाही.रामजन्माच्या ठिकाणीच राममंदिर बनवून दाखवले, रामराज्य निर्माण करायचे हे आमचे ध्येय आहे.

गडकरी पुढे म्हणाले, शेती क्षेत्राची प्रगती मर्यादित होती. मात्र, गेल्या दहा वर्षात मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे शेती क्षेत्रात अनेक सुधारणा झाल्या आहेत. सध्या शेती क्षेत्राचा विकासदर तीन टक्के झाला आहे. अनेक कायमस्वरूपी योजना राबविल्या जात आहेत. कांद्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साठवणुकीची योग्य व्यवस्था करण्याचे धोरण आहे. कांदा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांवर प्रक्रिया करण्याची गरज आहे. तशी व्यवस्था सरकारने करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची अडचण दूर होईल, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की नाशिकचे द्राक्ष, कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात होतात. त्या निर्यातीस चालना दिली जाईल. उद्योग व व्यापार वाढल्याने रोजगार निर्मिती होऊन गरिबी कमी होण्यास मदत होईल.

नागरिकांच्या कल्याणासाठी भारत सरकारने विविध योजना आणल्या, एक कोटी 80 लाख लोकांना कर्जाचे वाटप करण्यात आले. इथेनॉल काळाची गरज आहे, त्याच्या निर्मितीसाठी शेतकर्‍यांना व साखर कारखान्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, भारत सरकार कडून भरीव सहकार्य करणार आहे.नाशिकला आगामी कुंभमेळ्यासाठी भरीव सहकार्य केले जाईल, असे आश्वासन गडकरी यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या