Tuesday, March 25, 2025
Homeनगरव्यापारी अहुजांना 60 हजाराला लुटले तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

व्यापारी अहुजांना 60 हजाराला लुटले तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर(प्रतिनिधी) – कापड दुकान बंद करून रात्रीच्यावेळी घरी जात असलेले व्यापारी कमलेश अमरलाल अहुजा (रा. द्वारकानगर, बालिकाश्रमरोड) यांना पत्रकार चौकात तिघांनी दुचाकी आडवी लावून धक्काबुकीकरत त्याच्याजवळील 60 हजाराचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी अहुजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अहुजा यांनी शुक्रवारी (दि. 13) रात्री एमजीएम रोडवरील कापड दुकान बंद करून दुचाकीवरून घराकडे चालले होते. साडेनऊच्या सुमारास पत्रकार चौकातील आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना दुचाकी आडवी लावली. तिघांनी अहुजा यांना धक्काबुकी करत त्यांच्या जवळील रोख रक्कम, सोन्याची चैन, हातातील अंगठी, बँग, कागदपत्रे असा 60 हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

- Advertisement -

याप्रकरणी अहुजा यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : पानिपत येथे स्मारक उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक (Memorial) उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis...