जळगाव | Jalgaon
मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ज्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये थेट भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी राजकारणात कुठेतरी थांबवलं पाहिजे, नव्या पुढीला प्रोत्साहन दिले पाहिजे असे म्हणत एकप्रकारे राजकीय वारसदाराचेच नाव जाहीर केले होते. त्यावरुन, राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असता, आता पुन्हा एकदा महाजन-खडसे वाद समोर आला आहे. आता या प्रकरणावरुन रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे (BJP) उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लीपमध्ये थेट भाजपाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांच्याबद्दल या ऑडिओ क्लिपमध्ये आक्षेपार्ह शब्द वापरण्यात आली. त्याबाबत रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया दिली असून सोशल मीडियावर सध्या भाजपचा नेता विजय चौधरी आणि एका मंत्र्यांची कॉल रेकॉर्डींग व्हायरल होत आहे. गटाराचे झाकण उघडल्यावर घाण ओसंडून वाहते तशी घाणेरडी भाषा या संभाषणातून बाहेर पडत आहे, अशा शब्दात रोहिणी खडसेंनी व्हायरल रेकॉर्डींगवर प्रतिक्रिया दिली.
Abhijeet Dipke: नातवाच्या वयाच्या लोकांना धमकावत…; अभिजीत दिपकेंची मोदी शहांवर टीका
प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन रावणाची वृत्ती
पुढे रोहिणी खडसे यांनी म्हटले, आश्चर्य या गोष्टीचं आहे की, आपली हिंदू संस्कृती, भारतीय सभ्यता या विषयांवर आभाळ हाणणाऱ्या पक्षातील नेत्यांची ही भाषा आहे. इतर पक्षातील महिलांना तर हे बोलतच आहेत, पण स्वतःच्या पक्षातील महिलांबद्दल बोलतानाही यांच्या तोंडाला लकवा मारत नाही. भारतीय जनता पक्षात काम करणाऱ्या माझ्या महिला भगिनींनी सावध रहावे. कारण मुखात प्रभू श्रीरामांचं नाव घेऊन रावणाची वृत्ती असलेल्या लोकांसोबत तुम्ही काम करत आहात, असे म्हणत रक्षा खडसेंसह भाजप मधील महिलांनाही रोहिणी खडसेंनी सल्ला दिला आहे.
‘टपोरींना’ संस्काराच्या क्लासेसमध्ये घालावे
पुढे त्या म्हणाल्या, सोशल मीडियावर लोक अपशब्द वापरतात म्हणून मागील अधिवेशनात मुख्यमंत्री महोदयांनी अशा लोकांचे कान टोचले होते. पण मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपल्या पक्षात असलेल्या ‘टपोरींना’ संस्काराच्या क्लासेसमध्ये घालावे आणि या विजय चौधरी नामक घाणीचा तर राजीनामा घेऊन चालणार नाही, त्याची थेट हकालपट्टी करावी, अशी मागणीही रोहिणी खडसे यांनी केली आहे.
काय आहे नेमक प्रकरण?
भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाची एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह व भाषेचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
आणि आपण रक्षा खडसेला मंत्री बनून ठेवले आहे. मग हिला काढले पाहिजे… हे कुठेतरी थांबले पाहिजे ना… उठले सुटले घाणेरडे काहीही आरोप करतो…******** काहीतरी निर्णय करावा लागेल. रक्षा खडसे मंत्रिमंडळात आहेत. एकाच घरात राहतात एकमेकांना मदत करतात.. यादरम्यान मंत्री गिरीश महाजन हम्म… हम्म… हम्म… म्हणताना दिसत आहेत. पुढेल विजय चाैधरी यांनी म्हटले की, हे कसे सहन करायचे आपण? याला गिरीश महाजन यांनी म्हटले की, बरोबर आहे..
विजय चाैधरी यांनी म्हटले की, तुम्ही सांगा काय करायचे. प्रत्येक वेळेस काहीही झाले तरीही तुमच्यावर येतो दादा… ******** देणे आणि घेण्याचे काहीही त्यात तथ्य नसते. आपण काहीतरी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे आणि पार्टीला सांगितले पाहिजे, असे चालणार नाही आणि दुहेरी भूमिका चालणार नाही. एकदर रक्षाने राजीनामा द्यावा हे फालतूपणा चालणार नाही. भाऊ.. सगळे एका घरात खडसेही मुलगीही पण..




