
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati Sambhajinagar
नीट पेपरफुटी प्रकरण आणि माजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी आणि इतर विद्यार्थी संघटनांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे महिनाभर आंदोलन केले होते. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विविध मुद्द्यांवर अभिजीत दीपके यांनी भाष्य केले. वेळी दीपकेने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. भाजपकडून थेट धमकी दिल्याचा त्याने सांगितले आहे. तसेच आई-वडिलांना देखील घरी जाऊन पाहून घेऊ असे देखील त्याने म्हटले आहे.
अभिजीत दिपके यांनी काय म्हंटले?
ऑफर आली तरी मी भाजपमध्ये जाणार नाही- अभिजीत दीपके
मला कितीही वेळा भाजपकडून ऑफर आली, तरी मी भाजपमध्ये जाणार नाही. मला धमक्या येतायत की भाजपमध्ये या, तुमच्यासाठी चांगलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे त्यांच्या नातवाच्या वयाच्या लोकांना धमकावत आहेत, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असा आरोपही अभिजीत दीपके यांनी केला. कोणत्याही एका माणसाला मोठं करू नये. 2014 साली एक माणूस सत्तेत आला आणि तेव्हापासून देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी प्रश्नांवर कुणीच बोलत नाही, असेही अभिजीत दीपके म्हणाले.
नाहीतर खाकी पँट काढून, मग खाकी चड्डी घालावी
आम्ही आंदोलन केलं तेव्हा आमच्यावर 24 तास कॅमेरे होते. पोलिसांचे, मीडियाचे सगळेच कॅमेरे होते. आता पोलिसांनी जर कॅमेरापासून घाबरण्याची एसओपी बनवली असेल तर त्यांची चूक असेल. पोलिसांनी एकतर संविधान फॉलो करावं, नाहीतर खाकी पँट काढून, मग खाकी चड्डी घालावी आणि भाजपच्या मुख्यालयाच्या समोर घोषणाबाजी करावी, अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली. आंदोलनाच्या आधीच पाहिलं होतं दगडांनी भरलेला ट्रक आणू ठेवला होता, हे मी स्वत: पाहिलं. दगडांनी भरलेला ट्रक मुख्य दिल्लीत आला कसा? एक फुटलेली व्हॅन उभी करायची…हा सगळा पोलिसांचा आधीपासूनचा प्लॅन होता की नंतर विद्यार्थ्यांवर उलटवायचं, असा दावाही अभिजीत दीपकेंनी केला आहे.
कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येतंय असं जर सरकार म्हणत असेल तर हे त्यांचं फेल्युअर आहे. तुम्ही सत्तेत असताना आम्हाला फंडिंग कसं झालं?, असा सवालही अभिजीत दीपके यांनी उपस्थित केला आहे.
तर आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहु
आता जे केंद्रीय शिक्षणमंत्री आहेत, ते अत्याचाराचं समर्थन करतात. धर्मेंद्र प्रधानांना पदावरून काढून आणखी एक विचित्र माणूस पदावर बसवला. यांच्याकडे सगळेच लोक तसे आहेत. त्यांच्याकडे पर्याय काय आहे?, असंही अभिजीत दीपके म्हणाले. जेन झीला ट्रोल करून काय मिळणार…हीच मुलं उद्या देश चालवणार..ही मुलं सामान्य घरातली आहेत, असं अभिजीत दीपके यांनी सांगितले. तसेच मी स्वतः शेतकरी घरातून आलो आहे. जेव्हा जेव्हा गरज असेल, तेव्हा तेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहू, असंही अभिजीत दीपके यांनी स्पष्ट केलं.
रामदेव बाबांवर टीका
बाबा रामदेव यांनी आंदोलक तरुणांवर निशाणा साधत म्हटले की, ” “Gen Z ने भारताला बदनाम केले असून शिवीगाळ करणे ही आपली संस्कृती नाही. आई-वडील, गुरू आणि ज्येष्ठांचा आदर करणे ही आपली परंपरा आहे. देश हा रस्त्यावर उतरून नव्हे, तर संसद आणि संविधानाच्या आधारे चालतो. शिक्षणमंत्री कोण असावा हे रस्त्यावर ठरत नाही, तर संसद आणि पंतप्रधान ठरवतात.”
बाबा रामदेव यांच्या या टीकेवर अभिजीत दीपके यांनी तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले, “पेपरफुटीमुळे देशाची खरी बदनामी झाली आहे, त्यावर आंदोलन करणे म्हणजे बदनामी नव्हे. आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे फोटो बाळगणे, ‘जय भीम’च्या घोषणा देणे ही जर बदनामी वाटत असेल, तर आम्ही ती करत राहू.”
पुढे बोलताना दीपके यांनी पतंजलीच्या उत्पादनांवर सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या आक्षेपांची आठवण करून दिली. “ज्या पतंजलीच्या उत्पादनांवरून सुप्रीम कोर्टाने फसवणुकीचा ठपका ठेवला आहे, त्यावर रामदेवांनी लक्ष केंद्रित करावे, अन्यथा ती कंपनी बंद पडेल. संस्कृती आणि लोकशाही कशी सांभाळायची हे Gen Z ला चांगले ठाऊक आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
कंगना रणावतवर टीका
अभिजीत दिपके याने कंगना राणावत हिच्याबद्दल बोलताना म्हटले की, त्यांच्याबद्दल काय बोलू? जेंनझीला ट्रोल केलं जातं कळत नाही. हे मुलं आहेत कोण. ते 15 ते 28 वयोगटातील आहेत. त्या मुलांना ट्रोल करून काय भेटणार. हेच मुलं नागरिक आहे. हेच देश चालवणार आहेत. तेच वोटर आहेत. त्यांना का ट्रोल करता. ते सामान्य घरातील मुलं आहेत. त्यांना ट्रोल करून काय मिळणार?




