Saturday, April 4, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: अजितदादांच्या मृतदेहाबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं? रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा

Rohit Pawar: अजितदादांच्या मृतदेहाबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं? रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यानंतर सुरू असलेल्या चौकशीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजित पवारांचा अपघात कसा झाला? ते कारने पुण्याला जाणार होते, मग विमानाने का गेले? यात कुणाचा सहभाग असावा, असे अनेक प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. शिवाय अजित दादांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीवर देखील त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले.

रोहित पवार यांनी काल (मंगळवारी) मुंबईत पत्रकार परिषद घेतली त्यानंतर आज दिल्लीतही त्यांनी याबाबतची माहिती दिली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक महत्त्वपूर्ण खुलासे केले. अजित पवारांचा अपघात झाला की घात झाला असे वाटते त्याबाबतच्या शंका देखील रोहित पवारांनी बोलून दाखवल्या.

- Advertisement -

अजित दादांना घेऊन जाणाऱ्या व्हीएसआर कंपनीवर देखील त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. सर्व गोष्टींचा सखोल आणि पारदर्शक तपास करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. त्याचबरोबर आज दिल्लीत रोहित पवार यांनी नवीन खुलासा केला आहे. अजित पवार यांच्या मृतदेहाबद्दल डॉक्टरांनी काय माहिती दिली होती, याबाबत रोहित पवारांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा नवीन खुलासा केला आहे.

Rahul Gandhi: तुम्हाला भारत विकण्याची लाज वाटत नाही का? तुम्ही आमची आई, भारतमाता विकली; राहुल गांधी सरकारवर बरसले

अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही बाब आपण सांगितली नव्हती असेही ते म्हणाले. ज्यावेळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला, त्यावेळी त्यांचे सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. त्यामध्ये अजित पवारांचा मृतदेह मोठ्या प्रमाणात फुगल्याचा दावा केला जात होता. तो मृतदेह अजित पवारांचा आहे का? याबाबतही संभ्रम होता. मात्र, त्यानंतर आता फुगलेल्या मृतदेहाबाबत रोहित पावरांनी माहिती देताना म्हटले की, “डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादांची बॉडी खूप सुजलेली होती. मी जेव्हा त्यांना विचारले भाजल्यानंतर शरीर सुजते का? त्यावर त्यांनी सांगितले की, हो शरीर सुजते. अजित दादांची बॉडी असामान्यपणे खूप जास्त सुजलेली होती. ती का इतकी सुजलेली होती, ते पाहणेही महत्त्वाचे आहे, अशी नवी माहिती रोहित पवारांनी दिली. यामुळे आता अजित पवारांसोबत नेमके काय घडले? याचे गूढ वाढतच चालले असल्याचे चित्र आहे.

दुर्घटनेचा तपास अत्यंत संथ गतीने सुरु – रोहित पवार
“दादा विमानप्रवासात कधीही धोका पत्करत नसत. ते नेहमी कॅप्टनच्या सूचनांचे पालन करत,” असे रोहित पवार म्हणाले. संबंधित कंपनीकडून उड्डाणाला परवानगी देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला. तसेच, दुर्घटनेची चौकशी अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू २८ जानेवारी २०२६ रोजी बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात झाला. अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे खासगी विमानाने निघाले होते. बारामती येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ते जाणार होते. मात्र सकाळी ८:४३ ते ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ हे विमान कोसळले

ताज्या बातम्या

Breaking News : दिंडोरीत विहिरीत कार कोसळून नऊ जणांचा मृत्यू; दरगोडे...

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori आज दिनांक ३ एप्रिल २०२६ रात्री दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी शहरात कार क्रमांक MH15-JS-1053 विहिरीत कोसळली. या अपघातात कार मधील ९...