Thursday, September 19, 2024
HomeराजकीयRohit Pawar On Bjp Internal Survey : "भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत...

Rohit Pawar On Bjp Internal Survey : “भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला, विधानसभेत अजितदादांना ७, तर शिंदेंना….”; रोहितपवारांचा सर्वात मोठा दावा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. या निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

राज्यातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून महाविकास आघाडी महायुती सरकारवर निशाणा साधत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अपेक्षीत यश मिळवून महायुतीला दणकाच दिला. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी X अकाउंटवरून पोस्ट करत मोठा दावा केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील घटकपक्षांना किती जागा मिळणार याबाबत रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट केली आहे. आपल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात, एका internal source च्या माहितीनुसार परवाच भाजपचा अंतर्गत सर्व्हे आला आहे.

हे ही वाचा : शेवगाव-पाथर्डी तालुक्यात धुमाकूळ घालणारी टोळी जेरंबद

या सर्व्हेत अजितदादांच्या गटाला ७-११ जागा, शिंदे साहेबांच्या गटाला १७-२२ जागा आणि भाजपला ६२-६७ जागा मिळून लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्याने भाजपमध्ये अंतर्गत गोटात भीती पसरलीय. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत.

भाजपच्या एका मोठ्या केंद्रीय नेत्याने परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या असून अजितदादांनी (Ajit Pawar) पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना मतदारसंघातच रोखण्यासाठी त्यांच्या विरोधात मोठे नेते उभे केले किंवा अपक्ष उभे करण्याची तयारी दाखवली तर ६ ते ७ जागा अतिरिक्त देण्याचीही ऑफर दिलीय, असा दावा आमदार रोहित पवार यांनी केलाय.

दरम्यान, महायुतीतील तीन पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जात असल्याने जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या, यावरून सध्या या तीन पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. कारण अनेक मतदारसंघांमध्ये महायुतीतील घटकपक्षांचे एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील किमान २५ मतदारसंघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत व्हावी अशी मागणी राज्यातील भाजपा नेत्यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचे समजते.

हे ही वाचा : बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीने दिली वाहनांना धडक, चालकासह एकाला अटक

- Advertisment -

ताज्या बातम्या