Tuesday, October 15, 2024
Homeब्रेकिंग न्यूजChandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीने दिली वाहनांना धडक, चालकासह एकाला अटक

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीने दिली वाहनांना धडक, चालकासह एकाला अटक

नागपूर | Nagpur

राज्यात हिट अँड रन प्रकरणांचा आलेख वाढतच चाललाय. याच दरम्यान नागपूरमध्ये भरधाव वेगाने आलेल्या एका आलिशान कारने रविवारी मध्यरात्री शहरात दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धडक दिली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

- Advertisement -

ज्या भरधाव आलिशान कारने अपघात (Nagpur Audi Accident) झाला ती गाडी एका बड्या राजकीय नेत्याच्या मुलाची असल्याचं समोर आलं आहे. हा बडा राजकीय नेता म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. ज्या आलिशान कारनं अपघात झाला ती कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा मुलगा संकेत यांची असल्याची माहिती स्वतः बावनकुळेंनी दिली आहे. दरम्यान याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हे हि वाचा : श्रीरामपुरात क्षमायाचना कार्यक्रमात दोन गटात वाद

पोलिसांच्या माहितीनुसार, संकेत यांची कार त्यांचा चालक अर्जुन हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) यांना चालवायला दिली होती. याच कारने रविवारी मध्यरात्री वाहनांना धडक दिली. अपघातग्रस्त जितेंद्र सोनटक्के (४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चालक हावरे आणि चिंतमवार यांना अटक केली. पोलिसांनी कार जप्त करून पोलीस ठाण्यात आणली. त्यावेळी तिची ‘नंबर प्लेट’ काढण्यात आल्याचे उघड झाले. कार कुणाच्या नावावर आहे, याची माहिती वाहतूक कार्यालयाकडून मागविल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान या प्रकरणावर बोलताना बावनकुळे यांनी सर्वांसाठी न्याय एकसारखा असावा, दोषींवर कारवाई व्हावी,असे स्पष्ट केले. ‘ नागपूर येथे झालेल्या अपघात प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी पूर्ण चौकशी करावी, कोणालाही वेगळा न्याय लावू नये व दोषींवर कारवाई व्हावी’, अशी स्पष्ट भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली.

हे हि वाचा : कॅफे हाऊसमध्ये नेऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अपघात घटनेतील गाडी माझ्या मुलाच्या नावे असल्याचे सांगून बावनकुळे म्हणाले, मी कुठल्याही पोलीस यंत्रणेशी बोललो नाही. पोलिसांनी तपास करताना सीसीटीव्ही फुटेज तपासावेत,कोणतेही दडपण न ठेवता योग्य कार्यवाही करावी. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही, यासाठी मी परमेश्वराचे आभार मानतो. परंतु या घटनेची चौकशी व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे हि वाचा : तुडुंब भरलेल्या जायकवाडीचे ६ दरवाजे उघडले, गोदाकाठच्या गावांना…

- Advertisment -

ताज्या बातम्या