Wednesday, January 7, 2026
HomeराजकीयRohit Pawar : 'रमी' प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, "मानहानीची...

Rohit Pawar : ‘रमी’ प्रकरणावरून कोकाटेंची मानहानीची नोटीस; रोहित पवार म्हणाले, “मानहानीची एवढी काळजी होती तर…”

मुंबई । Mumbai

विधान परिषदेत मोबाईल रमी खेळताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले होते. रमी प्रकरणामुळे त्यांना आपले कृषिमंत्रिपद गमवावे लागले. त्यांचे खाते बदलून क्रिडा व युवक कल्याण हा विभाग त्यांना देण्यात आला आहे. आता कोकाटेंनी मोठं पाऊल उचलले आहे.

- Advertisement -

माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना थेट मानहानीची नोटीस पाठविली आहे. रोहित पवार यांनीच सोशल मीडियातून ही माहिती दिली. त्यांनी ही नोटीसही पोस्ट केली आहे. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल, असे पवारांनी म्हटले आहे.

YouTube video player

रोहित पवारांचे ट्वीट काय?

माजी कृषिमंत्र्यांचा सभागृहात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केला म्हणून मला मानहानीच्या दाव्याची नोटीस आलीय. कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळे एवढे मोठे कांड करूनही वाचलात. मानहानीची एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केलेच कशाला? शेतकऱ्यांप्रती असलेला आपला कळवळा आणि आपण केलेले पराक्रम सांगण्याची वेगळी गरज नाही.

तुम्ही पाठवलेली नोटीस मजेशीर आहे, नोटीस वाचून हसू आवरता आले नाही. पण लक्षात ठेवा, पुराव्याशिवाय मी बोलत नाही. तुम्ही पत्ते खेळत होतात हे मी पुराव्यासकट प्रुफ केलं होतं आणि उद्या देखील पुराव्यासकट प्रुफ करेल.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...