Monday, July 8, 2024
Homeक्रीडा"...नाहीतर मी पुढे त्याला बसवले असते"; सूर्य कुमारच्या 'त्या' कॅचबद्दल रोहित काय...

“…नाहीतर मी पुढे त्याला बसवले असते”; सूर्य कुमारच्या ‘त्या’ कॅचबद्दल रोहित काय म्हणाला?

मुंबई | Mumbai
टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या महाराष्ट्रातल्या चार खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांना आमंत्रण दिलं होतं. यावेळी कर्णधार रोहित शर्माने विधानभवनात मराठीत भाषण केलं. यावेळी त्याने सूर्यकुमार यादवने टिपलेल्या झेलचा उल्लेख केला आणि सभागृहात एकच हशा पिकला.

- Advertisement -

काय म्हणाला रोहित शर्मा?


सर्वांना माझा नमस्कार.. इथे बोलवल्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खूप खूप आभार… आमच्यासाठी असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार… काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होते. विश्वचषक जिंकणे आमचे स्वप्न होते. २०२३ मध्ये संधी थोडक्यात हुकली. सूर्या, दुबे किंवा माझ्यामुळे हे झाले नाही… सर्वांमुळे हे सिद्ध झाले. सर्व सहकारी माझ्यासोबत होते, त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे होऊ शकले. या वर्ल्ड कपसाठी आम्ही ११ वर्ष थांबलो होतो. २०१३ ला आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो’, असे रोहित म्हणाला.

‘मी सगळ्यांचा आभारी आहे, हे माझ्यामुळे, सूर्या, दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झाले, सगळ्या खेळाडूंमुळे झाले आहे. मी नशीबवान आहे, कारण माझ्याकडे असलेले सगळे प्लेअर सॉलिड होते. वेगवेगळ्या मॅचमध्ये वेगवेगळ्या प्लेअरनी हात वर केला’, अशी प्रतिक्रिया रोहित शर्माने दिली.

‘सूर्याच्या हातात बॉल बसला, हे सूर्याने सांगितलं. बरे झाले त्याच्या हातात बॉल बसला. नाहीतर मी पुढे त्याला बसवले असते. सगळ्यांचे धन्यवाद, धन्यवाद मुंबई. जय हिंद जय महाराष्ट्र’, असे म्हणून रोहित शर्माने त्याचं भाषण संपवले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या