Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशमोठी बातमी! शाळेचे छत कोसळल्याने ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ८ विद्यार्थी जखमी;...

मोठी बातमी! शाळेचे छत कोसळल्याने ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू तर ८ विद्यार्थी जखमी; कुठे घडली दुर्घटना

राजस्थान | Rajasthan
राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात सरकारी प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. यात चार मुलांचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे. तर ८ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान शाळेच्या इमारतीचे छत अचानक कोसळले. या घटनेनंतर कॅम्पसमध्ये गोंधळ उडाला. प्रशासनाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

झालवाडच्या डांगीपुरा पोलीस ठाण्याचे प्रमुख विजेंद्र सिंह यांनी सांगितले की, ज्याठिकाणी शाळेचे छप्पर कोसळले तिथे जवळपास १७ मुले उपस्थित होते. या दुर्घटनेत चार मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर आठ विद्यार्थी गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

प्रार्थना सुरु असताना छत कोसळलं
विद्यार्थी शाळेच्या सकाळच्या नियमीत प्रार्थनेला उपस्थित असताना हा अपघात झाला. दरम्यान, अचानक शाळेचे छत कोसळले. या ढिगाऱ्याखाली अनेक विद्यार्थी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच लोकांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. ही घटना घडली तेव्हा शाळेत सुमारे 60 विद्यार्थी उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार, 30 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून इतर काही गंभीररीत्या जखमी झाले आहेत. गंभीर झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

YouTube video player

या दुर्घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी शोक व्यक्त केला आहे. झालावाड येथील पिपलोडी शाळेची इमारत कोसळून झालेली दुर्घटना दुःखद असल्याचे ते म्हणाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचार सुविधा देण्याबाबत संबंधित यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनीही जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून या संपूर्ण घटनेबाबत माहिती घेतली.

तर स्थानिक नागरिकांनी संबंधित शाळेची इमारत आधीपासूनच जीर्ण झालेली होती आणि याबाबत प्रशासनाला अनेक वेळा तक्रार करण्यात आली होती. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...