Friday, November 22, 2024
Homeक्राईमNashik Crime News : 'आयटीआय' मध्ये १९ लाखांचा घोटाळा

Nashik Crime News : ‘आयटीआय’ मध्ये १९ लाखांचा घोटाळा

एसीबीच्या चौकशीत तिघांचा कारनामा उघड, बनावट बिले केली पास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सातपूर (Satpur) येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तत्कालिन प्रभारी प्राचार्याने बनावट बिले सादर करुन १९ लाख रुपयांचा घोटाळा (Scam) केला आहे. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) प्राचार्यासह त्याच्या दोन वेंडरवर गुन्हा दाखल केला असून त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. वसतिगृहासाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी करुन ते खरेदी न करता, फक्त बिले सादर करुन ती वटवून संशयिताने भ्रष्टाचार केल्याचे एसीबीने फिर्यादीत नमूद केले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची खबरदारी घ्या; मंत्री भुसेंचे कृषी विभागाला निर्देश

याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष मारुती कदम असे तत्कालिन प्रभारी प्राचार्याचे नाव असून तो सन २०१७ ते २०१८ या कालावधीत सातपूर आयटीआय (Satpur ITI) येथे कार्यरत होता. तर, कदमला साहित्य पुरवठा करणाऱ्या गेट वे सिस्टीम्सचे संचालक रोशन बधान आणि गोकुळ पूरकर व इतरांची चौकशी लवकरच सुरु होणार आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काही दिवसांपूर्वी सातपूर आयटीआयमार्फत वसतिगृहांतील साहित्याच्या खरेदीत कदम यांनी झोल केल्याचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाची दखल घेऊन एसीबीच्या पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घार्गे यांनी पोलीस उपअधिक्षक अनिल बडगुजर, वैशाली पाटील आणि नरेंद्र पवार यांना तपास करुन सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

त्यानुसार पथकाने तक्रारीचा तपास केला असता सुभाष कदम आणि केंद्र शासनाच्या जेम(जेईएम) पोर्टलवर नोंदणी केलेल्या साहित्याचे गेट-वे सिस्टीमचे संचालक आणि पुरवठादार रोशन बधान आणि गोकुळ पूरकर यांच्यातील आर्थिक व्यवहार संशयास्पद आढळून आले. तर, यात बनावट बिले तयार करुन ती मंजूर केल्याचे आढळून आले. त्यानुसार, पुरावे मिळाल्यावर उपअधिक्षक वैशाली पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) फिर्याद नोंदविली. त्यानुसार संशयितांवर आर्थिक अनियमितता, शासनाच्या रकमेचा अपहार, फसवणूक (Fraud) आणि भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविला आहे.

असे उकळले पैसे

सुभाष कदम याने प्राचार्य पदाचा गैरवापर करून शासकीय संकेताप्रमाणे काम न करता मनमानी केली. आयटीआयच्या अखत्यारितील वसतिगृहांत खुर्च्या, लाकडी व लोखंडी पलंग(कॉट), चादर, उशी व इतर साहित्य मागविण्यासाठी कदम यांनी बधान व पूरकर यांच्या मदतीने केंद्राच्या जेम पोर्टलवर खरेदी प्रक्रिया पूर्ण केल्याचे दाखविले. बधान व पुरकर यांनी स्पेसिफिकेशनप्रमाणे साहित्याचा पुरवठा केला नसतानाही कदम याने ही बाब माहिती असतानाही संगनमत करून त्यांचा फायदा करुन शासनाच्या १९ लाख ३३ हजारांचा अपहार केला. तपास उपअधिक्षक बडगुजर करत आहेत.

जेवणावळ, चहाचे खोटे बिल मिळविले

सन २०१७ मध्ये भरविण्यात आलेल्या आयटीआय तंत्रप्रदर्शन व क्रिडा स्पर्धेदरम्यान कदम याने प्रशांत कडू बडगुजर यांच्यामार्फत जेवणाचे १९ हजार रुपयांचे खोटे बिले संबंधित यंत्रणेसह शासनाकडे सादर करुन त्यापैकी साई टी स्टॉलचे सतिश वाघमारे यांना आठ हजार रुपये रोख देत उर्वरीत अकरा हजार रुपये आणि श्रीनिवास फ्लॉवरकडील कोरे बिले घेऊन अंदाजे पाच हजार ९१० रुपये असे एकूण १९ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या फायद्यासाठी शासनाच्या निधीचा दुरूपयोग केला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या