Saturday, May 17, 2025
Homeनाशिकसरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्या नाशकात

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत उद्या नाशकात

 

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत दि. 18 ते 20 मे दरम्यान नाशिक येथे येत आहेत. यावेळी नाशिक येथे आयोजित संघ शिक्षा वर्गात ते मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राचा ‘कार्यकर्ता विकास वर्ग प्रथम’ (सामान्य) 18 ते 40 वर्ष या वयोगटातील तरुण स्वयंसेवकांचा प्रशिक्षण वर्ग 11 मेपासून सुरू झाला आहे. या वर्गात शिक्षार्थींना मार्गदर्शन करण्यासाठी सरसंघचालक डॉ. भागवत यांचे 18 मे रोजी दुपारी 3.30 वाजता शिर्डी येथील विमानतळावर आगमन होणार आहे. शिर्डी येथे साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेऊन ते नाशिकला रवाना होणार आहे. सायंकाळी 6 वाजता त्यांचे नाशिक येथे आगमन होईल. येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या परिसरात या वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

18 ते 21 मेपर्यंत सरसंघचालक या वर्गस्थानी मुक्कामी असणार आहेत. 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता ते पुढील प्रवासास मार्गस्थ होतील. या दरम्यान त्यांचे कोणतेही जाहीर कार्यक्रम असणार नाहीत.

येत्या 1 जूनपर्यंत चालणार्‍या या वर्गात महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यातून म्हणजे संघ रचनेतील विदर्भ, देवगिरी, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि सौराष्ट्र अशा सहा प्रांतातील 280 स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. यात शेतकरी, लघुउद्योजक, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, शिक्षक आदिंसह उच्च महविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

या वर्गात सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी हे ही मार्गदर्शन करणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

कार-टेम्पो अपघातात तिघांचा मृत्यू

0
नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon नांदगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पोखरी शिवारात भरधाव इर्टींगा कारने विरूध्द दिशेने जात मालवाहतूक करणार्‍या टेम्पोस धडक दिल्याने झालेल्या अपघातात जळगाव, ता. निफाड...