Sunday, January 25, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘फुकट प्रवेशा’च्या 303 जागा रिक्तच

Ahilyanagar : ‘फुकट प्रवेशा’च्या 303 जागा रिक्तच

आरटीईमध्ये 9 हजारांपैकी निम्मेच 4 हजार 510 अर्ज पात्र

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात आरटीई प्रवेश प्रक्रिया चार महिने राबवून देखील 303 जागा रिक्त राहिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे लॉटरी लागल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही राखीव जागा रिक्त राहिल्या आहेत. त्यामुळे यंदा काही प्रमाणात पालकांनी आरटीईकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम तिसरी यादी देखील लावण्यात आली, पण पालकांनी पाल्याचा प्रवेश घेतला नाही.द जिल्ह्यात 2 हजार 958 विद्यार्थ्याचे आरटीई अंतर्गत प्रवेश झालेले आहेत.

- Advertisement -

समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेले पालक जास्त प्रवेश शुल्क असलेल्या शाळांमधून आपल्या मुलांना शिकवू शकत नव्हते; मात्र आरटीईमुळे अशा पालकांचे त्यांच्या मुलांना खासगी शाळांमधून शिकवण्याचे स्वप्न साकार होत आहे. दरम्यान यंदा शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेशाच्या प्रक्रियेला एक महिने विलंबाने सुरू झाली. दरवर्षी डिसेंबरपासून प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होऊन एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले जातात. यंदा मात्र जानेवारीपासून प्रक्रिया सुरू होऊन मेपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासोबतच प्रवेशाचे निकष सुद्धा बदलवण्यात आले. त्याचा परिणाम आरटीई प्रवेशावर सुद्धा दिसून आला.

YouTube video player

नगर जिल्ह्यात 348 शाळांमध्ये 3 हजार 261 विद्यार्थ्यांना आरटीईमधून प्रवेशसाठी जागा होत्या. त्यासाठी जानेवारीपासून सुरू झालेल्या प्रवेश प्रक्रियेत 9 हजार पाल्यासाठी पालकांचे अर्ज आले होते. त्यापैकी सोडतीसाठी 4 हजार 510 अर्ज पात्र ठरले होते. त्यातून 2 हजार 958 विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी दोन ते तीन वेळा मुदत वाढ देऊनही 2 हजार 958 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित 303 पाल्याच्या पालकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या जागा रिक्त राहिल्या. यापूर्वी आरटीईच्या प्रवेशासाठी पालकांच्या उड्या पडत होत्या. मात्र आता अर्जांची संख्या देखील कमी झाली असून प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. 3 हजार 261 जागांसाठी यंदा 9 हजार अर्ज आले. यातील निम्मेच 4 हजार 510 अर्ज पात्र होते. यातील 2 हजार 958 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून 46 अर्ज या प्रक्रियेत रद्द करण्यात आले आहे.

तालुकानिहाय शाळा व प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : कंसात शाळांची संख्या अकोले- (13) 130, जामखेड- (9) 61, कर्जत- (18) 117, कोपरगाव- (23) 241, अहिल्यानगर शहर- (21) 218, अहिल्यानगर तालुका- (42) 265, नेवासा- (27) 215, पारनेर- (23) 181, पाथर्डी- (19) 122, राहाता- (36) 404, राहुरी- (25) 233, संगमनेर- (25) 285, शेवगाव- (27) 185, श्रीगोंदा- (16) 79, श्रीरामपूर- (24) 222.

ताज्या बातम्या

लोकलमध्ये धक्का लागल्याचा राग, रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाला संपवलं; आरोपी तरूणाला अटक

0
मुंबई । Mumbai मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवरील गर्दी आणि त्यातून होणारे वाद किती भीषण रूप धारण करू शकतात, याचा एक धक्कादायक प्रकार शनिवारी संध्याकाळी मालाड...