Saturday, May 25, 2024
Homeनगरप्रियसीचा धारदार चाकूने खून

प्रियसीचा धारदार चाकूने खून

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

लिव्ह इनमध्ये राहणार्‍या महिलेने दुसर्‍या मुलीशी लग्नाला विरोध (Marriage Opposition) केला. यामुळे राग आलेल्या प्रियकराने सविता सुनील बत्तीशे (वय 25) या प्रियसीचा चाकुने (Knife Girl Friend Murder) भोकसुन निर्घृन खून (Murder) केला. यानंतर तो स्वत:च शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) हजर झाला.

- Advertisement -

रूई (Rui) शिवारातील भोपळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली. मयत सविता ही पहिला पती व दोन मुलांना सोडून आरोपी अजय राजेंद्र म्हस्के, रा. राम सोमय्यानगर, सावळीविहीर याचेसोबत पती-पत्नी सारखी राहत होती. रविवारी सकाळी रूई (Rui) येथील भोपळे वस्तीवर अजय म्हस्के याने त्याची पत्नीचा खुन केल्याचा कॉल 112 वर आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आपल्या पथकासह भोपळे वस्तीवर धाव घेतली. तेथे सदर महिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती. घटनास्थळावरून तिला साईबाबा रूग्णालयात (Sai Baba Hospital) हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ती मृत असल्याचे सांगितले.

शिर्डीकरांना पूर्वीप्रमाणेच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

आरोपी (Accused) अजय म्हस्के हा स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अजयच्या आई-वडील त्याचे लग्न ठरवत होते. मात्र मयत सविता हिने अजयला दुसर्‍या मुलीबरोबर लग्न (Marriage) करण्यास विरोध केला. या कारणावरून दोघांमध्ये वादविवाद (Dispute) होत असल्याने सविताच्या त्रासाला कंटाळून तिचा धारदार हत्याराने भोकसून खुन (Murder) केला असल्याचे अजयने पोलिसांना सांगितले.

कडू आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अजयवर शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा रजिस्टर क्रमांक 615/2023, भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ अधिक तपास करत आहेत.

राहाता बाजार समितीतील वाचा कांद्याचा भाव शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणी खंडपीठाची प्रशासनाला नोटीस

- Advertisment -

ताज्या बातम्या