Friday, May 17, 2024
Homeदेश विदेशRules Change from Today : अर्थसंकल्पापूर्वीच देशात 'या' नियमांमध्ये बदल, पेट्रोल, डिझेल...

Rules Change from Today : अर्थसंकल्पापूर्वीच देशात ‘या’ नियमांमध्ये बदल, पेट्रोल, डिझेल आणि LPG किमतीबाबत मोठी अपडेट

सरकारी नियमांत होणाऱ्या बदलांचा सर्वसामान्यांच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम होत असतो. आज, १ फेब्रुवारीपासून अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत.

या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. क्रेडिट, डेबिट कार्डच्या नियमांपासून ते एलपीजी गॅस, म्युच्युअल फंड, अटल पेन्शन योजनेशी संबंधित हे बदल आहेत. जाणून घेऊया आजपासून येणाऱ्या नव्या नियमांबद्दल…

- Advertisement -

Accident news : कार-बसचा भीषण अपघात, महिलेसह चौघांचा मृत्यू

बजेटपूर्वी गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत मोठी माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पापूर्वी सरकार गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकेल, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, मात्र फेब्रुवारी महिन्यातही गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. तसेच तेल कंपन्यांनी सिलिंडरच्या किमतीत वाढदेखील केलेली नाही.

तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत.आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट झाली आहे. ब्रेंट क्रूड ८४,४९ डाॅलर्स प्रती बॅरल्सवर आहेत. यात दोन टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. याचा परिणाम देशांतर्गत पातळीवर फारसा झालेला नाही. म्हणूनच, बजेटच्या २५५ व्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

“राष्ट्रवादाच्या नावाखाली…”; अदाणींच्या ४१३ पानांच्या उत्तरावर Hindenburg चं प्रत्युत्तर

टाटा मोटर्सने १ फेब्रुवारीपासून प्रवासी वाहनांतील आयसीई पोर्टफोलियोतील वाहनांच्या किंमतीत वाढ कऱण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने किंमतीतील वाढीसाठी नियमाकीय बदल आणि कच्च्या किंमतीतील वाढलेल्या किंमती ही कारणे सांगितली आहेत. आज पासून व्हेरियंट आणि माॅडेल्सच्या आधारानुसार किंमतीत १.२ टक्के वाढ होईल.

घरापर्यंत सोडतो म्हणाला अन्…; धक्कादायक घटनेनं पनवेल हादरलं

नोएडा भागात पेट्रोल इंजिन असलेल्या १५ वर्षांपेक्षा जूनी वाहने आणि डिझेलची १० वर्षे पूर्वीच्या वाहनांना रजिस्ट्रेशनच्या आधारावर जप्त केली जाणार आहेत.

आजपासून रेंट बाय क्रेडिट कार्डावर कोणत्याही प्रकारचा रिवाॅर्ड पाॅईंट दिला जाणार नाही. त्याशिवाय कॅलेंडर महिन्याच्या दुसऱ्या रेंटल ट्रॅन्झॅक्शनपासून १ टक्का अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. हा बदल बँक आँफ बडोदा, एचडीएफसी बँकेने केला आहे.

Fire : इमारतीला भीषण आग; १० महिला, ३ मुलांसह १४ जणांचा होरपळून मृत्यू

- Advertisment -

ताज्या बातम्या