Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजरुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी? अजित पवारांकडे सुपूर्द केला राजीनामा,...

रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी? अजित पवारांकडे सुपूर्द केला राजीनामा, मात्र अद्याप…

पुणे | Pune
अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर विरुध्द रुपाली पाटील-ठोंबरे यांच्यामध्ये वाद पाहायला मिळला होता. आता वादानंतर रुपाली पाटील-ठोंबरे या अजित पवारांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. रुपाली पाटील ठोंबरे यांचा पक्षाचा शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षामधील नाराजीनंतर रुपाली पाटील यांनी थेट पक्षश्रेष्ठी अजित पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पक्षातून बाहेर पडण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नुकतीच रुपाली पाटील यांनी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याची चर्चा होती. मात्र ही भेट राजकीय नसल्याचे सांगत त्यांनी याआधी ‘घड्याळ’ सोडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. परंतु पक्षांतर्गत वादामुळे अस्वस्थ असलेल्या रुपाली पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला जय महाराष्ट्र करणार हे निश्चित मानले जात होत. रुपाली पाटील या पुण्यातील माजी नगरसेविका आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून २०२१ मध्ये रुपाली पाटलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

- Advertisement -

रुपली चाकणकरांविरोधात आक्रमक भुमिका
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महिला डॉक्टरबाबतच वक्तव्य केले होते. त्यामुळे रुपाली पाटील-ठोंबरे यांनी या प्रकरणात आक्रमक भूमिका घेत आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांच्यावर मृत महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करण्याचे आरोप केले होते. याप्रकरणी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी विरोधकांसोबत मिळून रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन देखील केले होते.

YouTube video player

प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी
मात्र याप्रकरणी पक्षाने रुपाली पाटील-ठोंबरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच पक्षाने प्रवक्तेपदावरून रुपाली पाटील-ठोंबरे यांची हकालपट्टी देखील केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रुपाली ठोंबरे पाटील या पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अशातच दोन दिवसांपूर्वी रुपाली पाटील-ठोंबरे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत काँग्रेसच्या नेत्या संगीता तिवारी आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शर्मिष्ठा येवले यादेखील उपस्थित होत्या.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना रुपाली पाटील-ठोंबरे म्हणाल्या होत्या की, “कोणत्या पक्षात काम करायचे आणि कोणता नेता आपल्याला पाठिंबा देतोय, हे पाहण्याचा अधिकार कार्यकर्त्याला आहे. तसेच माझे प्रवक्तेपद गेले म्हणून मी काम करणे थांबवलेले नाही. जर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला चांगली ऑफर मिळाली, महिलांचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान होत असेल, तर मी नक्कीच विचार करेल,” असे सूचक वक्तव्य रुपाली पाटील-ठोंबरे यांनी केले होते. त्यामुळे त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच पक्षांतर्गत वादामुळे अस्वस्थ असलेल्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी पक्षाचा शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा अजित पवार यांच्याकडे केला सुपूर्द केला आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे पक्षातून बाहेर पडण्याचा घेणार निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...