Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशपंतप्रधान मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी ३५ मिनिटं फोनवर चर्चा

पंतप्रधान मोदींची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांशी ३५ मिनिटं फोनवर चर्चा

दिल्ली | Delhi

रशिया-युक्रेनमध्ये (Russia-Ukraine war) अद्यापही सुरू आहेत. रशियाकडून मागील १२ दिवस युक्रेनवर हल्ला केले जात आहेत. रशियाकडून सुरू असलेल्या बॉम्ब हल्ले, गोळीबारात सामान्यजणांचे हाल होत आहेत.

- Advertisement -

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांच्याशी फोनवरुन तब्बल ३५ मिनिटं संवाद साधल्याची माहिती मिळाली आहे. (Prime Minister Narendra Modi spoke on phone to President Volodymyr Zelensky of Ukraine)

Hina Khan : हिनाचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटोंवर चाहते घायाळ

आज सकाळी ११.३० मिनिटांनी मोदींनी जेलेन्स्की यांनी फोन केला. त्यानंतर दोघांमध्ये सद्य परिस्थितीवर चर्चा झाली. युद्ध विरामासाठी रशिया आणि युक्रेनकडून चर्चा केली जात असल्याच्या मुद्द्याचं पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्याचं बोललं जात आहे. यासोबतच भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना मायदेशात परतण्यासाठी युक्रेनकडून केलं जात असलेल्या सहकार्याबाबत मोदींनी जेलेन्स्की यांचे आभार व्यक्त केले आहेत.

तसेच सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये पंतप्रधानांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबा मागितला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुकेश अंबानी नव्हे तर गौतम अदानी ‘आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती’

दरम्यान रशिया-युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अनेक देश मध्यस्थी करत हे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दोन्ही देशांनी एकत्र बसून चर्चेच्या माध्यामातून यावर तोडगा काढावा, यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे प्रयत्न केले जात आहे. पण दोन्ही देश युद्धातून माघार घ्यायला तयार नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या