Monday, November 18, 2024
Homeक्राईमसचिन कोतकरसह दोघांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा

सचिन कोतकरसह दोघांविरूध्द कोतवाली पोलिसांत गुन्हा

रिक्षा चालकाला मारहाण करून हातपाय तोडण्याची धमकी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

‘तु येथे रिक्षा लावली तर तुझे हातपाय तोडू’ अशी धमकी देत रिक्षा चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शनिवारी (16 नोव्हेंबर) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माळीवाडा येथील रिक्षा स्टॅण्डवर घडली. शब्बीर गुलाब बागवान (वय 39 रा. मुकुंदनगर) असे मारहाण झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे.

- Advertisement -

त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन कोतकर (पूर्ण नाव नाही रा. केडगाव) व संतोष निमसे (पूर्ण नाव नाही रा. शाहुनगर, केडगाव) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे रिक्षा चालवितात. ते त्यांची रिक्षा माळीवाडा येथील रिक्षा स्टॅण्डवर लावण्यासाठी शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता गेले होते. त्यावेळी सचिन कोतकर व संतोष निमसे त्यांना म्हणाले, ‘तु येथे रिक्षा लावायची नाही, तुम्ही येथे धंदा करायचा नाही’ असे म्हणून त्या दोघांनी फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

तसेच ‘तू येथे रिक्षा घेऊन आला तर तुझे हातपाय तोडू’ अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर फिर्यादी यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोघांविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कपिले करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या