Friday, April 25, 2025
Homeनगरमी सचिन तेंडुलकर बोलतोय…

मी सचिन तेंडुलकर बोलतोय…

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणजे अनेकांच्या गळ्यातील ताईत. स्वर्गीय सुखाचा आनंद सचिनने आपल्या खेळातून सर्वांना दिला. त्यामुळेच निवृत्तीनंतरही त्याची मोहिनी चाहत्यांवर कायम आहे. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात एका फोन कॉलची जोरदार चर्चा आहे. हा फोन कॉल सचिन तेंडुलकरच्या नावाने येत आहे. मी सचिन तेंडुलकर बोलतोय.. असे फोन कॉल महाराष्ट्रातील लोकांना येत आहेत. बर्‍याचदा नामांकित लोकांच्या नावाने फोन कॉल येतो आणि त्यानंतर ही काही गोष्टी करण्यासाठी सांगितल्या जातात. या फोन कॉलमध्येही अशीच एक गोष्ट आहे. सचिन तेंडुकरच्या आवाजात तुम्हा फॉन कॉल येतो आणि एक गोष्ट करण्यासाठी तुम्हाला सांगितली जाते.

- Advertisement -

सचिन तेंडुलकर आपल्याशी बोलतोय, हा अनुभव बर्‍याच जाणांना सुखावणारा आहे. कारण सचिन तेंडुलकरचा आवाज आपल्या मोबाईलवर ऐकणं यासारखं सुख चाहत्यांसाठी दुसरं काही नसेल. बरीच जणं सचिनचे नाव ऐकूनच हरवून जातात. त्यानंतर सचिनच्या आवाजात नेमकं काय म्हटलं जातं, याकडे त्यांचं लक्ष नसतं. पण सचिनच्या आवाजात फोन कॉल करणं ही एक ट्रीक वापरण्यात आलेली आहे. कारण हॅलो मी सचिन तेंडुलकर बोलतोय… असं म्हटल्यावर त्याच्या आवाजात एक संदेश दिला जातो.

हा संदेश महाराष्ट्रात होणार्‍या निवडणूकांबाबत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरच्या नावाचे रेकॉर्डींग यावेळी एका खास कारणासाठी वापरले आहे. सचिन तेंडुलकरचा मोठा फॅनबेस आहे. त्यामुळे सचिन जे सांगतो ते बरीच लोकं ऐकतात, असे म्हटले जाते. त्यामुळे सचिनच्या आवाजात मतदान करण्याचे आवाहन यावेळी या फोन कॉलच्या माध्यमातून केले जात आहे. जेणेकरून लोकांनी सचिनचे ऐकावे आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावायला हवा. त्यामुळे सचिनचा फोन कॉल आल्यावर मतदानाचा हक्क बजावण्याची एकमेव मोठी गोष्ट करायची असल्याचे आवाहन केले जात आहे. ही गोष्ट करण्याची विनंती सचिन आपल्या फोन कॉलमधून करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...