Monday, May 20, 2024
Homeक्रीडाSachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; वानखेडेवर पुर्णाकृती...

Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; वानखेडेवर पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

मुंबई | Mumbai

भारताचा स्टार फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पुर्णाकृती पुतळ्याचे मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede Stadium) अनावरण करण्यात आले. यावेळी सचिन तेंडुलकरसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व खासदार शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी चाहत्यांनी सचिन सचिन नावाचा एकच जयघोष केल्याचे पाहायला मिळाले…

- Advertisement -

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी मांडली राज्य सरकारची भूमिका, म्हणाले…

मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरच्या या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण (Unveiling) करण्यात आल्याने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सचिनचा हा पुर्णाकृती पुतळा त्याचा आयकॉनिक शॉट खेळतानाचा असून तो वानखेडे स्टेडियममधील सचिन तेंडुलकर स्टँडच्या जवळ उभारण्यात आला आहे. तसेच हा पुतळा प्रसिद्ध आर्टिस्ट प्रमोद कांबळे (Pramod Kamble) यांनी तयार केला आहे.

सचिन तेंडुलकरच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाचा आधीचा मुहूर्त हा त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीचा होता. मात्र, पुतळ्याला फिनिशिंग टच देण्यात आला नसल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर आज या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सचिन तेंडुलकरने वानखे़डे मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले असून २०१३ मध्ये त्याने वानखेडेवर क्रिकेट कारकिर्दीमधील अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला होता. याशिवाय वानखेडेवरच २०११ साली वन डे मधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी सचिनला विराट कोहली आणि युसुफ पठाणने (Virat Kohli and Yusuf Pathan) आपल्या खांद्यावर उचलून घेत संपूर्ण मैदानाला फेरी मारली होती. यावेळी सचिनच्या हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असल्याचे समाधान दिसले होते.

Maratha Reservation : सर्वपक्षीय आमदारांनी ठोकले मंत्रालयाला टाळे; पोलिसांकडून धरपकड

दरम्यान, सचिन तेंडुलकरने दोन दशाकांहून अधिक काळ क्रिकेटवर अधिराज्य गाजवले असून त्याला क्रिकेटचा देव म्हणूनही ओळखले जाते. सचिन तेंडुलकरने वनडे आणि कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे शतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. सचिनने वनडेमध्ये १८ हजार ४२६ तर कसोटीत १५ हजार ९२१ धावा केल्या आहेत. तसेच सचिनच्या या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे हे देखील उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Supriya Sule : “…म्हणून सांगते संभल के रहो”; सुप्रिया सुळेंचा अजितदादांना सल्ला

- Advertisment -

ताज्या बातम्या