Tuesday, May 28, 2024
Homeनगरसदगुरू गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहास सराला बेटावर आज प्रारंभ

सदगुरू गंगागिरी महाराज 174 व्या अखंड हरिनाम सप्ताहास सराला बेटावर आज प्रारंभ

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

करोनाच्या पार्श्वभुमिवर (Covid 19 Problem) यंदाही सदगुरु गंगागिरी महाराज 174 वा अखंड हरिनाम सप्ताह (Sadguru Gangagiri Maharaj 174th Akhand Harinam Saptah) सराला बेटावरच (Sarala Bet) आज गुरुवार दि. 12 ऑगस्टपासून सुरू होत आहे. राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून सप्ताहास प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी सारखाच यावर्षीही साध्यापध्दतीने हा सप्ताह होत आहे. प्रशासनाचे निर्बंध असल्याने भाविकांना सप्ताह काळात बेटावर येता येणार नाही.

- Advertisement -

दोनशे वर्षांच्या परंपरा असलेल्या या सराला बेटाचा (Sarala Bet) हा 174 वा अखंड हरिनाम सप्ताह (Sadguru Gangagiri Maharaj 174th Akhand Harinam Saptah) आहे. सप्ताह समितीने या सप्ताहाचे नियोजन केले आहे. प्रहरा मंडपाची उभारणी मंदिराच्या सभामंडपात करण्यात आली आहे. ते प्रवचन व किर्तनाचे स्थळ बेटाच्या नेहमीच्या प्रवचन स्थळी शामियाना उभारून करण्यात आली आहे. या शामियान्यात उद्या शुक्रवार दि. 13 पासून दररोज दुपारी 1 वाजता महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांचे प्रवचन होणार आहे.

एकादशी आणि सांगतेला कीर्तन सोहळा असेल. भाविकांना प्रवचन कीर्तन श्रवणाची आस लागुन असते. त्यामुळे गंगागिरी महाराज युट्युब चॅनेलवरून भाविकांना महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचन किर्तनाचा आस्वाद घेता येईल. तसेच दैनिक सार्वमत ही या सप्तहास कव्हरेज देणार आहे.

करोनामुळे प्रशासनाने कडक निर्बंध आणल्याने करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांना सप्ताह स्थळी येता येणार नाही. बेटावर येणारे रस्ते बंद करण्यात येणार असल्याने भाविकांनी आपल्या घरात बसून मोबाईलमध्ये युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्रवचन, किर्तनाचा आस्वाद घेता येईल. बेटावर कुणाही येऊ नये. आपल्या घरी बसूनच भजन करावे. बेटावर येण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. हा सप्ताह अत्यंत साध्या पध्दतीने होणार असल्याने भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. सप्ताह काळात बेटावर येऊ नये.

– महंत रामगिरी महाराज, श्रीक्षेत्र सराला बेट.

- Advertisment -

ताज्या बातम्या