Saturday, November 2, 2024
Homeभविष्यवेधसद्‌गुरूंचा संदेश : दुर्धर आजारांना कसं हाताळावं?

सद्‌गुरूंचा संदेश : दुर्धर आजारांना कसं हाताळावं?

प्रश्न – गेली अनेक वर्षे मी एका असाध्य आजाराने ग्रस्त आहे. माझ्याच बाबतीत हे असे का घडले? माझ्या वाईट कर्मामुळे तसे झाले आहे का?

सद्गुरू – ज्या दिवशी आपला जन्म झाला तेंव्हापासून, आपण काय खाल्ले, आपण काय वाचले, आपण काय केले, आपण कोणत्या वातावरणात राहिलो, आपण कोणत्या प्रकारच्या लोकांच्या संपर्कात होतो, हे सर्व घटक एकत्रित येऊन आज आपण कोणत्या प्रकारची व्यक्ती आहोत तसे आपल्याला बनवत असतात. ज्या दिवशी आपण जन्माला आलो तेंव्हापासून, आपण कोणत्या कृती केल्या त्या सर्वांच्या प्रभावानुसार आज आपण त्या प्रकारची व्यक्ती बनलो आहोत. कर्म म्हणजे कृती. कर्म म्हणजे एखाद्या प्रकारची बक्षीस किंवा शिक्षा देणारी व्यवस्था प्रणाली नाही. कर्म म्हणजे केवळ कृती आणि परिणाम. प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो. ही कृती केवळ शारीरिक असणे गरजेचे नाही. कृती ही मानसिक, भावनिक, शारीरिक आणि उर्जेच्या पातळीवर घडत असते. प्रत्येक कृतीची नोंद ठेवली जाते आणि त्या कृतीचा छाप तयार झालेला असतो. ज्याला आपण कर्म असे म्हणतो, त्या जमा झालेल्या कृतींमुळे, वृत्ती-प्रवृत्ती निर्माण करण्याकडे तुमचा कल असतो. या वृत्ती-प्रवृत्ती तुम्हाला एकतर आरोग्य आणि कल्याणाच्या दिशेने किंवा आजार-व्याधी किंवा आयुष्यात इतर प्रकारच्या परिस्थितींकडे घेऊन जाऊ शकतात. पण त्या गोष्टी दिशा ठरविणारे घटक नाहीत. त्या फक्त तुम्हाला एका ठराविक मार्गाने घेऊन जायचा प्रयत्न करत असतात एवढंच. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दिशा ठरविण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला नेहेमीच आहे. मानवी चेतनेची हीच क्षमता आहे – तुम्ही साठवलेल्या कर्मांच्या छापांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला जे हवे ते करू शकता. आपण आत्ता काय करत आहोत, या क्षणी आपण कोणते कर्म करत आहोत हे अतिशय महत्वाचे आहे. आपण भूतकाळात जे काही केले ते कदाचित आजाणतेपणे केले असेल पण या क्षणी तुम्ही जर सजग असाल तर, तुम्ही दुःखात लोटणारी कर्मे करणार नाही. कोणतीही व्यक्ती तसे करणार नाही.

- Advertisement -

आपलं आयुष्य आपण आज आणि उद्या कोणत्या पद्धतीने जगणार, त्याचं कार्य करणार आहोत हे आपल्यासाठी अधिक महत्वाचे आहे, आपली जुनी कर्मे नाहीत. जे आधीच घडून गेले आहे ते आपण बदलू शकत नाही. पण जे अगोदरच घडून गेले आहे त्याकडे पाहून आपण आपल्या आत आपण थोडेफार सजग, सचेत होऊ शकतो; जे अगोदरच घडून गेले आहे तो आपल्यासाठी एक धडा असू शकतो. आपण ते बदलू शकत नाही पण सध्या काय घडते आहे त्याबद्दल आपण योग्य अशी कृती करू शकतो. आणि आपण जर आपली ऊर्जा आणि लक्ष केंद्रीत केले, तर भविष्यात काय घडणार आहे त्याबद्दल सुद्धा आपण काहीतरी करू शकतो. हीच आपल्या देशाची ही एक भली मोठी समस्या आहे; आपल्या समोर जे आहे ते आपण बदलत नाही, ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्या आपण करत नाही, पण आपण दररोज देवाला त्याने काय करायला हवे ते सांगत असतो. देवाला हे माहिती नाही का? त्याला मोकळे सोडा आणि त्याला त्याचे काम करू द्या. तुम्ही तुमचे कार्य योग्यरित्या करायला हवे. एक मनुष्य म्हणून तुमच्या अधिकारात काय आहे ते तुम्ही करायला हवे.

एक योगी, द्रष्टा, आत्मज्ञानी आणि प्रसिद्ध लेखक असा लौकिक असलेले सद्गुरू हे भारतातील पहिल्या 50 अतिशय प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. सदगुरूंना भारत सरकारतर्फे 2017 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ते 3.9 अब्ज लोकांपर्यंत पोहोचलेल्या कॉन्शस प्लॅनेट – सेव्ह सॉइल (माती वाचवा) या जगातील सर्वात मोठ्या

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या