Wednesday, December 4, 2024
HomeनगरKopergoan News : नदीत पाय घसरून पडल्याने दोघा तरुण शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू,...

Kopergoan News : नदीत पाय घसरून पडल्याने दोघा तरुण शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू, कोपरगाव तालुक्यातील घटना

रांजणगाव देशमुख । वार्ताहर

सध्या सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु असून सर्वच कुटुंबात आनंदाचा क्षण आहे. परंतु याच आनंदावर विर्जन पडल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील मढी येथे घडली आहे.

- Advertisement -

कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक मध्ये उम्रावती नदीवर गाडी धुवत असताना पाय घसरुन नदीत पडल्याने दोन शेतकऱ्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १) रोजी सायंकाळी घडली. उत्तम राहणे (वय ४२), व माधव गमे (वय ३२) असे मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मढी येथील उम्रावती नदीवर आपले चारचाकी वाहन धुण्यासाठी गेले असता उत्तम राहणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहणे हे आपले वाहन धुत असताना पाय सरकून नदीत पडले. त्याच वेळी माधव गमे हे देखील त्यांना वाचवण्यासाठी गेले. दोघांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बेपत्ता झाले.

ही माहिती पंचक्रोशीत पसरल्यानंतर स्थानिकांनी त्यांना शोधले पण त्यांना त्यात यश आले नाही. नंतर कोपरगाव नगर परिषदेच्या पथकाने शोध घेतला. त्यावेळी मृतदेह सापडण्यास यश आले आहे. ऐन दिवाळीत राहणे आणि गमे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या