Wednesday, October 23, 2024
Homeनगरसाईबाबांविषयी अवमानजनक वक्तव्य पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

साईबाबांविषयी अवमानजनक वक्तव्य पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

श्रीसाईबाबा संस्थान आणि साईभक्तांच्या भावना दुखावणार्‍या व्हिडिओमुळे साईबाबांच्या समकालीन भक्तांचे वंशज निलेश कोते यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत गौतम खट्टर आणि अजय शर्मा यांच्यावर श्रीसाईबाबा यांच्याविषयी अत्यंत अवमानजनक व निंदा करणारे वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

निलेश कोते हे साईबाबांचे निकटवर्तीय भक्त तात्यापाटील कोते व साईबाबांवर पुत्रवत प्रेम करणार्‍या बायजाबाई कोते यांचे वंशज आहेत. त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे़ कोते यांच्या म्हणण्यानुसार गौतम खट्टर यांनी सोशल मीडियावर श्रीसाईबाबा यांच्या जन्माचे ठिकाण, धर्म आदींच्या बाबत अत्यंत चुकीचे, अपमानजनक, संतापजनक वक्तव्य केले आहे. तसेच साईसच्चरित्रा विषयी सुद्धा आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या वक्तव्याचा व्हिडीओ करून त्यांनी सोशल मीडियातून प्रसारीत केला आहे. याशिवाय साईबाबा संस्थानने अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या बांधकामासाठी निधी नाकारला, मज्जीदसाठी पैसे दिले अशा चुकीच्या व साईबाबा आणि साई संस्थानची बदनामी करणारे, तथ्यहीन आरोपांमुळे भाविकांमध्ये संतापाची भावना आहे. गौतम खट्टर यांच्या वक्तव्यामुळे साईभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

गौतम खट्टर यांनी युटुब, फेसबुक, इन्स्टाग्रॅम तसेच व्हाटसअप व्दारे श्रीसाईबाबाबद्दल व्हिडीओ प्रसारीत केल्याने या चॅनल वरील व्हिडीओ पाहून वाराणसी येथील सनातन संस्थेचे अध्यक्ष अजय शर्मा व इतर काही लोकांनी वाराणसी मध्ये असलेल्या मंदीरामधील श्रीसाईबाबांच्या मूर्ती काढून टाकलेल्या आहेत आणि साईबाबांविषयी आपत्तीजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी तसे व्हिडीओ प्रसारीत केले आहेत. यामुळे भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. समाजात तेढ निर्माण करणाजया या दोघां व्यक्तींवर कठोर कारवाईची मागणी निलेश कोते यांनी केली आहे. या प्रकरणी पोलीस उपअधिक्षक शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार पुढील तपास करत आहेत. शिर्डी पोलीसांनी हे प्रकरण सायबर शाखेकडेही पाठवले असुन युट्युब चॅनल्सलाही पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत असे निलेश कोते यांनी सांगितले.
कालच कमलाकर कोते यांनी अहिल्यानगर येथे सायबर सेलकडे तक्रार नोंदवली आहे. याशिवाय अनेक भाविक देशाच्या विविध शहरात साईबाबा व संस्थानची बदनामी करणाजयांच्या विरोधात तक्रारी दाखल करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या