Tuesday, January 6, 2026
Homeनगरसाई भक्ताची कार झाडावर आदळली

साई भक्ताची कार झाडावर आदळली

नांदुर्खी |वार्ताहर| Nandurkhi

राहाता (Rahata) तालुक्यातील नांदुर्खी बुद्रुक येथून जाणार्‍या शिर्डी विमानतळ रोडवर (Shirdi Airport Road) मंगळवारी सकाळीच विमान तळाकडून शिर्डीकडे (Shirdi) जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेलाच असलेल्या लिंबाच्या झाडावर धडकली. या गाडीमध्ये एक महिला, दोन पुरुष व तीन लहान मुले होते. धडक (Hit) इतकी जोराची होती की धडक बसताच समोरच असलेला विजेचा खांब वाकला. आवाज ऐकल्याने वस्तीवरील नागरिक मदतीला धावून आले. गाडीला एअर बॅगची सुविधा असल्याने गाडीचे दरवाजे तात्काळ उघडल्याने मोठा अनर्थ टळला.

- Advertisement -

कुणालाही गंभीर इजा झाली नाही. योगेश चौधरी, गणेश चौधरी, रविंद्र चौधरी, राहुल चौधरी, भाऊसाहेब चौधरी, शंकर उदावंत, माधव कांबळे या नागरिकांनी साईभक्त महिला पुरुषांना धीर देऊन रुग्णवाहिकेला संपर्क करून उपचारासाठी सहकार्य केले. दरम्यान तीन दिवसांपूर्वीच विमानतळ रोडवर अपघात घडून एक तरुण गंभीर जखमी (Injured) झाल्याने तो अद्यापही बेशुद्ध अवस्थेत आहे तर कार रोड वर असलेल्या गायांच्या कळपाला धडक देऊन अपघात (Accident) करून गेली आहे.

YouTube video player

अशा वारंवार अपघाताच्या (Accident) गंभीर घटना घडत असतांना विमानतळ मार्गावर गतिरोधक टाकण्यासाठी किंवा वाहनांचा वेग कमी करण्याचे फलक लावण्यासाठी संबंधित विभाग चालढकल करत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

ताज्या बातम्या

अज्ञात वाहनाच्या धडकेत दाम्पत्याचा मृत्यू

0
सटाणा | प्रतिनिधी Satana साक्री-शिर्डी रस्त्यावर ढोलबारे गावाजवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार झाले. संदीप गावित(३५) व आशाबाई संदीप गावित(३२) रा. अमली...