Wednesday, January 7, 2026
HomeनगरShirdi : साईंच्या मूर्तीवर 2 कोटी 50 लाख रूपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार

Shirdi : साईंच्या मूर्तीवर 2 कोटी 50 लाख रूपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार

शिर्डी | Shirdi

अवघ्या विश्वाला श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणार्‍या श्री साईबाबांच्या चरणी, शिर्डीनगरी दिवाळीच्या प्रकाशाने आणि भक्तीच्या रंगाने न्हाऊन निघाली. निमित्त होते ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीपूजनाचे. या अभूतपूर्व सोहळ्यात साईबाबांच्या तेजोमय मूर्तीवर तब्बल 2 कोटी 50 लाख रुपयांचे रत्नजडित सुवर्णालंकार चढवण्यात आले, जणू काही साक्षात वैभवानेच बाबांपुढे आपली मान झुकवली होती.

- Advertisement -

संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते जेव्हा पूजन झाले, तेव्हा हिरेजडित मुकुट, लाल मखमली शाल आणि पिवळ्या वस्त्रांमध्ये बाबांचे लोभसरूप अधिकच तेजस्वी दिसत होते. मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता.

YouTube video player

सायंकाळी 5 वाजता मुख्य पूजनाला सुरुवात झाली, तेव्हा काही काळासाठी दर्शनरांग थांबवून सारा आसमंत केवळ भक्तिरसात न्हाऊन निघाला. प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्या जणू भक्तांचे स्वागत करत होत्या, तर फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. दिवाळीचा पारंपरिक फराळ, जसे की लाडू, चिवडा, करंजी यांचा नैवेद्य बाबांना अर्पण केला गेला, ज्यामुळे उत्सवात घरगुती मांगल्याची भावना मिसळली होती.

लक्ष्मीपूजनानंतर द्वारकामाई आणि लेंडी बागेचा परिसर भक्तांनी लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघाला. हा सामूहिक दीपोत्सव म्हणजे साईचरणीअर्पिलेल्या निस्सीम भक्तीचा एक अविस्मरणीय अविष्कार होता. या मंगलमय।सोहळ्याला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्यासह संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि असंख्य साईभक्त साक्षी होते. सायंकाळी 6 वाजता झालेल्या धूपारतीने या भक्तिमय वातावरणात अधिकच चैतन्य भरले.

साईबाबांचे ऐश्वर्य संपत्ती
सुवर्ण -500 किलो पेक्षा अधिक, चांदी – 7000 किलो पेक्षा अधिक, बँक ठेवी- 3300 कोटी रुपये

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...