Sunday, April 27, 2025
Homeनगरसाईचरणी 43 लाखाचा सुवर्ण मुकूट अर्पण

साईचरणी 43 लाखाचा सुवर्ण मुकूट अर्पण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

एका साईभक्ताने (Sai Devotee) आज साईबाबांना 648 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकूट (Gold Crown) अर्पण केला आहे. या मुकूटाची किंमत तब्बल 43 लाख रूपये आहे. रविवारी सकाळी एका भाविकाने हा मुकूट साईचरणी अर्पण करण्यात आला. सकाळी साईसमाधी स्रानानंतर शिर्डी (Shirdi) माझे पंढरपुर (Pandharpur) या आरतीसाठी तो मुकूट साईसमाधीवरील बाबांच्या मुर्तीला चढवण्यात आला. या मुकूटाचे वजन 648 ग्रॅम असुन त्याची किंमत 42 लाख 80 हजार रूपये असल्याचे संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर (CEO Goraksh Gadilkar) यांनी सांगितले.

- Advertisement -

साईबाबांना (Sai Baba) सुवर्ण मुकूट अर्पण करणार्‍या या भाविकाने आपले नाव गोपनीय ठेवले आहे. साई संस्थानच्यावतीने या भाविकाचा सत्कार करण्यात आला. हा मुकूट अतिशय सुंदर असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आलेले आहे. साईबाबांना सुवर्णदान (Gold Donation) करणार्‍या भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...