Monday, August 26, 2024
Homeनगरसाईबाबा संस्थानकडून गुरूपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण

साईबाबा संस्थानकडून गुरूपौर्णिमा उत्सवाची तयारी पूर्ण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी शनिवार दिनांक 20 जुलै 2024 ते सोमवार दिनांक 22 जुलै 2024 या काळात गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होत असून, पुणे ते शिर्डी येणार्‍या पालख्यांना थांब्यांचे ठिकाणी साधारण 36 हजार चौ.फुट पावसाळी मंडप उभारणेत आलेले आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाकरीता देशाच्या व राज्याच्या काना कोपर्‍यातुन आलेल्या भाविकांची दर्शनाची व निवासाची व्यवस्था सुलभ व्हावी, म्हणून संस्थानच्या वतीने मंदिर व मंदिर परिसरात तसेच सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी साधारण 63 हजार 133 चौ.फुट पावसाळी मंडप उभारण्यात आलेले आहे. मंदिर व निवासस्थान आणि साईप्रसादालय आदी ठिकाणी येणे जाणे करीता जादा बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- Advertisement -

तसेच गुरुस्थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा, दर्शनरांग, नविन भक्तनिवासस्थान (500 रुम), साईआश्रम, साईप्रसादालय व मारुती मंदिराशेजारील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु करण्यात आलेले आहे. तसेच पालख्या शिर्डी येथे आल्यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्यवस्था करण्यात आली असुन, नविन भक्तनिवासस्थान व साई धर्मशाळा पार्किंग याठिकाणी निवास व्यवस्थेसाठी मंडप उभारणेत आलेले आहेत. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी नवीन दर्शनरांग साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाटयगृह, सेवाधाम, साईप्रसादालय व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आलेले आहे.

मागील वर्षी गुरूपौर्णिमा उत्सवात तीन दिवसात साई प्रसादालयामध्ये 1 लाख 54 हजार 946 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतलेला आहे. यावर्षी अंदाजे 2 लाख साईभक्त गुरूपौर्णिमा उत्सवात प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करणेत आलेले आहे. गुरूपौर्णिमा उत्सवाकरीता साई प्रसादालयामध्ये उत्सवाचे पहिल्या दिवशी बालुशाही, मुख्य दिवशी मुगडाळ शिरा व तिसरे दिवशी लापशी हे मिष्ठान्न म्हणून प्रसाद भोजनात देणेत येणार आहे. त्याची तयारी करणेत आलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या