Thursday, January 8, 2026
HomeनगरShirdi : मंगलमय वातावरणात साईनगरीत श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ

Shirdi : मंगलमय वातावरणात साईनगरीत श्रीरामनवमी उत्सवास प्रारंभ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित रामनवमी उत्सवास शनिवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली. लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साई नामाने साईनगरी दुमदुमून गेली आहे. साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने साईभक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. शनिवारी उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पोथी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी विणा घेऊन तर प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले व मंदीर विभाग प्रमुख विष्णू थोरात यांनी प्रतिमा घेवून सहभाग घेतला.

- Advertisement -

यावेळी संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे साईसच्चरित्र ग्रंथाच्या पारायणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी प्रथम अध्याय, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी व्दितीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले यांनी तृतीय अध्याय, प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी चौथा अध्याय व प्रशासकीय अधिकारी विश्वनाथ बजाज यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला. उत्सवाचे निमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्यांच्या पत्नी वंदना गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. सकाळी कृष्णेंद वाडीकर यांचा ‘राम रंगी रंगले’ हा कार्यक्रम तर दुपारी श्रींची माध्यान्ह आरती झाली. त्यानंतर साई आशीष यांचा साईभजन कार्यक्रम होवून सायंकाळी विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे कीर्तन झाले. सायंकाळी श्रींची धुपारती. रात्री आनंद यात्री हा कार्यक्रम असून रात्रौ 9.15 वाजता श्रींच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येईल.

YouTube video player

श्रींची शेजारती रात्रौ 10.30 वाजतोग होईल. यादिवशी अखंड पारायणासाठी व्दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने साईभक्त वेंकटे सुब्रमण्यन, रियाद, सौदी अरबिया यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, व्दारकामाई मंडळ व मुंबई येथील साईभक्त कपील चढ्ढा यांचेवतीने करणेत आलेली आकर्षक विद्युत रोषणाई व 4 नंबर प्रवेशव्दाराचे आतील बाजुस करणेत आलेल्या गजमुख गणपतीचा भव्य काल्पनिक देखाव्याने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेतले. दरवर्षीप्रमाणे मुंबई येथून आलेल्या साई सेवक व इतर पालखी पदयात्री भाविकांनी उत्सवात हजेरी लावली. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी, रविवारी पहाटे 5.15 वाजता श्रींची काकड आरती, पहाटे 5.45 वाजता अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी 6.20 वाजता कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्नान व दर्शन. सकाळी 7 वाजता श्रींची पाद्यपुजा, सकाळी 10 ते 12 यावेळेत विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे श्रीराम जन्म कीर्तन तर दुपारी श्रींची माध्यान्ह आरती होणार आहे.

दुपारी 1 ते 3 वाजता यावेळेत अलोक मिश्रा यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी विजय गुजर, मुंबई याचा साईभजन संध्या कार्यक्रम, निशाणाची मिरवणूक तर सायंकाळी श्रींचे रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. सायंकाळी श्रींची धुपारती होईल. तसेच मनहरजी उधास यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होणार आहे. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्यामुळे या दिवशी नित्याची शेजारती व दि. 7 एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. या दिवशी श्रींचे समोर रात्रौ 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत इच्छुक कलाकारांचे साईभजन कार्यक्रम होणार आहेत.

ताज्या बातम्या

AMC Election : शिवसेनेचा गड की भाजप-राष्ट्रवादीची मुसंडी?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अहिल्यानगरच्या मध्यवर्ती शहराचा भाग हा पारंपरिकदृष्ट्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या भागात शिवसेनेला सोबत घेऊनच यापूर्वी भाजपला काही प्रमाणात यश मिळाले होते....