Tuesday, March 25, 2025
Homeनगरशिर्डी साई परिक्रमाला देश-विदेशातून जनसागर उसळला

शिर्डी साई परिक्रमाला देश-विदेशातून जनसागर उसळला

साईबाबांच्या जयघोषाने भाविकांची साईनगरीला प्रदक्षिणा

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी (Shirdi) व पंचक्रोशीसह देशाच्या विविध भागातुन आलेल्या लाखाहून अधिक भाविकांनी भक्तीभावाने परिक्रमेच्या माध्यमातून साई नगरीला प्रदक्षिणा घातली. गुरुवारी परिक्रमा निमित्त भाविकांचा जनसागर शिर्डीत उसळलेल्या बघायला मिळाला. शिर्डी परिक्रमा (Shirdi Parikrama) निमित्त गुरुवारी 14 किलोमीटर लांबीच्या परिक्रमा मार्गावर अक्षरश: भक्ती आणि आनंदाची उधळण झाली. ग्रीन एन क्लीन शिर्डीच्या पुढाकारातून तसेच साईबाबा संस्थान, शिर्डी ग्रामस्थ, नगरपरिषद, पोलीस (Police), महसूल व देशभरातील भाविकांच्या सहयोगाने आयोजित परिक्रमा सोहळ्याचे हे सहावे वर्ष होते.

- Advertisement -

रतलामच्या भाविकांनी आणलेल्या रथात साई प्रतिमा, याशिवाय विविध शाळांच्या चित्ररथासह वेगवेगळे 15 रथ, समोर अब्दागीरी, छत्र, चामरे घेतलेले 500 भाविक, लेझीम, बॅन्ड पथके, साईसच्चरित्रातील सादर करण्यात आलेले जिवंत देखावे, साईभजन गाणारे कलाकार, महाराष्ट्र व तमिळनाडूतील पारंपरिक वाद्ये, वारकरी, ठिकठिकाणी सुवासिणींकडून होणारे औक्षण, पुजन, परिक्रमा मार्गावरील घरांघरावर उभारण्यात आलेल्या गुढ्या, धुनी असलेला रथ, परिक्रमा मार्गावर (Parikrama) दोन्ही बाजूंनी काढलेल्या रांगोळ्या, फुलांची सजावट, 15 स्वागत कमानी लक्षवेधी ठरल्या. परिक्रमेत महिलांची संख्या लक्षणीय होती. परिक्रमेच्या शेवटच्या टप्पात प्रत्येक भाविकाला साई संस्थानकडून (Sai Sansthan) बुंदी प्रसाद देण्यात आला.

परिक्रमावासियांसाठी अनेक ठिकाणी ग्रामस्थ व भाविकांकडून दूध, चहा, नास्ता, थंड पेये, बिस्किट, फळे, पाणी याची रेलचेल होती. भाविकांसाठी मोबाईल 100 टॉयलेट्स, 12 आडोसा स्वच्छतागृह, 13 रुग्णवाहिका, 5 वैद्यकीय पथके, 100 पॅरामेडिकल कर्मचारी व 1000 विद्यार्थी स्वयसेवकांची व्यवस्था होती. परिक्रमेच्या पाठोपाठ नगरपरिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांनी रस्ता स्वच्छ केला. खंडोबा मंदिरात आरती करून पहाटे परिक्रमेचा आरंभ झाला तर दुपारी शताब्दी मंडपात सांगता झाली. यंदाच्या परिक्रमेला महंत रामगिरी महाराज, काशिकानंदगिरी महाराज, देऊळकर महाराज, माजी खा. डॉ सुजय विखे पाटील, माजी मंत्री दीपक केसरकर, साईसंस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर, वंदना गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने, पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्यासह कैलास कोते, कमलाकर कोते, अभय शेळके, अर्चनाताई कोते, विजयराव कोते, सचिन तांबे, नितीन कोते, निलेश कोते, रमेश गोंदकर, रवींद्र गोंदकर, जगन्नाथ गोंदकर, रवींद्र कोते, अरविंद कोते, एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, मनसेचे दत्तात्रय कोते, हरिश्चंद्र कोते, अजय नागरे, दीपक नागरे, ग्रिन अ‍ॅन्ड क्लिनचे अध्यक्ष अजित पारख, डॉ. जितेंद्र शेळके, अ‍ॅड अनिल शेजवळ, संजय त्रिभुवन, मनीलाल पटेल, विशाल तिडके, ताराचंद कोते, किशोर बोरावके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एका नवदाम्पत्याने सकाळी विवाहपूर्वी जोडीने रथ ओढला तर निमगाव येथील एका पित्याने आपल्या अपंग मुलाला व्हील चेयर वरुन परिक्रमा घडवली.

परिक्रमा करणार्‍या भाविकांना शिर्डीतील साई सिद्धी डेव्हलपरचे प्रमुख अरविंद कोते यांनी दीड हजार क्विंटलची साबुदाणा खिचडी देण्याचे आयोजन केले होते. जवळपास 20 हजार भाविकांनी चहा, पिण्याचे पाणी बॉटल तसेच साबुदाणा खिचडी प्रसादाचा आस्वाद घेतला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...