Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमShirdi : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून साई संस्थान कर्मचार्‍यावर चाकू हल्ला

Shirdi : दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून साई संस्थान कर्मचार्‍यावर चाकू हल्ला

चार आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आऊटसोर्समध्ये काम करणार्‍या साहेबराव झाडे या युवकावर शिर्डीतील (Shirdi) चार तरुणांनी चाकू हल्ला (Knife Attack) करत त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी (Shirdi Police) चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

साहेबराव झाडे याने शिर्डी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी दुपारी 1 ते 9 या वेळेत मी साईबाबा संस्थानमध्ये (Sai Baba Sansthan) आऊटसोर्स कर्मचारी म्हणून संस्थांच्या बसवर मदतनीस म्हणून ड्युटी करीत होतो. रात्री 9 नंतर ड्युटी संपवून घरी जात असताना चौधरी वस्ती, श्रीराम नगर येथे माझ्या ओळखीचा अनिकेत संतोष पोटे याने मला रस्त्यात अडवून तू मला दारू पिण्यासाठी पैसे दे असे म्हणत पैशाची मागणी केली. मी त्याला माझ्याकडे पैसे नाही असे सांगितले. त्यावेळी अनिकेत पोटे याने माझे खिसे चापसायला सुरुवात केली. मी त्याला विरोध केला, म्हणून त्याने कमरेला असलेला चाकू (Knife) काढून माझ्या हातावर मारून मला जखमी केले. त्याच्यासोबत असलेल्या मित्र योगेश गाडे याने त्याच्या हातात असलेला रॉड माझ्या पाठीत मारला.

YouTube video player

तसेच रोहित चाबुकस्वार व सतीश अनारसे यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण (Beating) करण्यास सुरुवात केली. सतीश अनारसे याने माझ्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्या दरम्यान मी आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले असता त्यांनी तिथून पळ काढला. पळून जाताना ते मला म्हणाले, तू जर पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही, अशी त्यांनी मला धमकी (Threat) दिली. मी जखमी अवस्थेत शिर्डी पोलिस ठाण्यात आलो. पोलिसांनी मला उपचार घेण्यासाठी सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवले, अशी फिर्यात साहेबराव झाडे या युवकाने शिर्डी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी चाकू हल्ला व मारहाण करणार्‍या चार आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...