Sunday, October 13, 2024
Homeमनोरंजनसई म्हणतेय, रणवीरसोबत काम करायचंय

सई म्हणतेय, रणवीरसोबत काम करायचंय

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलीवूडमध्ये देखील स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने दुनियादारी’, ’प्यारवाली लव्हस्टोरी’ ते ’मिमी’ आणि ’भक्षक’पर्यंतचा प्रवास करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे.

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. लवकरच सई इमरान हाश्मी आणि ’स्कॅम 1992’ फेम प्रतीक गांधीबरोबर ’ग्राउंड झिरो’ या चित्रपटात झळकणार आहे. याव्यतिरिक्त सईने रणवीर सिंहबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सईला रणवीर सिंहसोबत काम करायचे आहे.

- Advertisement -

एका मुलाखतीत सईने याबाबत सांगितले आहे. सईला मुलाखतीत विचारण्यात आले की, कोणत्या अभिनेत्याबरोबर आणि दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची इच्छा आहे. यावर सई म्हणाली, “रणवीर सिंह, देव पटेल, शीराम राघवन, अनुराग कश्यप आणि नागराज मंजुळे. यांच्यासोबत मला काम करण्याचे आहे.“

यावर तिला पुढे प्रश्न विचारण्यात आला की तुला रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका मिळाली तर चालेल का? तिने “नाही“ असं स्पष्टचं सांगितलं. ती पुढे म्हणाली, ’बघा, भूमिका कशी आहे त्यावर अवलंबून आहे. वहिनी किंवा बहिणीची भूमिका असली तरी भूमिकेवर सगळं अवलंबून आहे.’ असं म्हणत तिने आपली भूमिका सांगितली. सईच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, सई शेवटची ’भक्षक’ या चित्रपटात भूमी पेडणेकरबरोबर झळकली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या