Tuesday, March 25, 2025
Homeनगरसाईबाबा मंदिराच्या सुरक्षेत ‘सिंबा’ची एन्ट्री

साईबाबा मंदिराच्या सुरक्षेत ‘सिंबा’ची एन्ट्री

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा मंदिराच्या सुरक्षा पथकात (Saibaba Temple Security Squad) आता सिंबा नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री (Simba Dog) झाली आहे. वर्धन श्वानानं दहा वर्ष सेवा दिल्यानंतर तीन महिन्याचा सिंबा आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झाला. सिंबाची बीडीडीएस पथकाकडून (Simba BDDS Team) ट्रेनिंग सुरू असून लवकरच तो साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे. साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र असल्याने येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात. याचबरोबर व्हीव्हीआयपी (VVIP) देखील मोठ्या प्रमाणात येत असतात. साई मंदिर आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने साईबाबा मंदिरासाठी स्पेशल बीडीडीएस पथक तैनात करण्यात आले आहे.

- Advertisement -

साईबाबांच्या मंदिरात होणार्‍या पहाटेच्या काकड आरती, मध्यान्ह आरती आणि धुपाआरती तसंच रात्रीच्या शेजाआरतीच्या अगोदर साईंच्या समाधी मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरात बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली जाते. बीडीडीएस पथकात पूर्वी वर्धन नावाचा श्वान कार्यरत होता. मात्र तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी आता सिंबा दाखल झाला. सिंबाचं सध्या साई मंदिर परिसरात (Sai Temple) प्राथमिक प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच तो पुणे सीआयडी येथून ट्रेन होऊन साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार असल्याची माहिती साई मंदिर पोलीस निरीक्षक सतीष घोटेकर यांनी दिली.

ते म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून साई मंदिरात वर्धन श्वानानं (Vardhan Dog) सेवा दिल्यानंतर आज तो सेवानिवृत्त झाल्यानं बीडीडीएस पथकातील अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पथकाच्या वतीनं वर्धनचा साईबाबांची शाल, फुलांचा हार देऊन सन्मान करण्यात आला तर सिंबाला साई मंदिर परिसरात आणण्यात आले. यावेळी साईबाबांची (Sai Baba) ओम साई राम नावाची शाल देऊन सिंबाचा (Simba) सत्कार करण्यात आला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...