मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्र्यातील घरी चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर लिलावतीत उपचार पार पडले असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या एकूण १५ टीम कार्यरत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सैफच्या इमारतीची तपासणी केली जात आहे. या संदर्भात डीसीपी दीक्षित गेडाम यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यात त्यांनी महत्त्वाच्या अपडेट दिल्या आहेत.
मुंबई झोन ९ चे डीसीपी दीक्षित गेडाम यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत या घटनेबाबत माहिती दिली. चोरीच्या उद्देशानेच हल्लेखोर सैफ अली खानच्या घरी घुसल्याची प्राथमिक माहिती आली आहे. आरोपीची ओळख निष्पन्न झाल्याचा दावा डीसीपी गेडाम यांनी केला आहे.
पुढे गेडाम म्हणाले की, काल रात्री, आरोपींनी सैफ अली खानच्या घरात प्रवेश करण्यासाठी फायर एस्केप जिना वापरला. यात एक आरोपी हा सैफ अली खानच्या घरी गेला होता, अशी माहिती समोर आली आहे. हा आरोपी आप्तकालीन परिस्थितीत बाहेर पडण्याच्या मार्गाने त्याच्या घरात पोहोचला, अशी माहितीही समोर आली आहे, असे डीसीपी दीक्षित गेडाम म्हणाले. तर एका आरोपीची मुव्हमेट या घटने दरम्यान सीसीटीव्ही कैद झाली आहे. त्या दिशेने त्याचा तपास सूरू आहे. यात १० वेगवेगळ्या टीम तपास करत आहेत.
प्राथमिकदृष्ट्या या आताच्या तपासात असे निष्पन्न झाले की या आरोपीने चोरीच्या उद्देषाने सैफ अली खानच्या घरी प्रवेश केला आहे. सध्या आम्ही आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करत आहोत. आरोपीला लवकरात लवकर अट करण्यात येईल. अटक केल्यानंतर आम्ही पुढच्या गोष्टी तुम्हाला सांगू असे गेडाम यांनी सांगितले आहे. त्याचसोबत घटनास्थळी कोणते हत्यार सापडले आहे का? याबाबत माहिती देणे गेडाम यांनी टाळले आहे. याउलट आरोपींच्या अटकेनंतर संपूर्ण माहिती देणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा