मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर गुरुवारी रात्री (१६ जानेवारी) चाकूने प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. आता सैफ अली खानच्या हेल्थ अपडेटविषयी आणखी बरीच माहिती समोर आली आहे. याविषयी सांगण्यासाठी लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या आरोग्याविषयी सविस्तर माहिती दिली.
डॉक्टरांनी लिलावती रुग्णालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की ‘सैफ अली खान जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा तो संपूर्ण रक्तबंबाळ होता. तरी देखील तो एका सिंहासारखा चालत आला. त्याने स्ट्रेचर सुद्धा वापरले नाही. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा लहान तैमूर होता. सैफ आता ठीक आहे. त्याला ICU मधून स्पेशल वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. आम्ही त्याला काही वेळापूर्वी भेटलो. त्याला आम्ही चालवण्याचा प्रयत्न केला. तर तो व्यवस्थित चालू शकत होता. त्याला सध्या कोणताही त्रास होत नाही आहे. त्याशिवाय त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नाही आहेत. सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरच त्याला आम्ही ICU मधून स्पेशल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे.’
हल्लेखोरानो सैपच्या पाठीवरही चाकूने हल्ला केला होता, त्याच्या पाठीच्या मणक्याजवळही दुखापत झाली होती, अशी माहिती समोर आली होती. याबद्दलही डॉक्टरांनी स्पष्ट माहिती ली. अवघ्या २ मिमीने सैफ यांचा मणका वाचला. तो चाकू थोडा आणखी खोल गेला असता तर त्यांच्या स्पायनल कॉर्डमध्ये दुखापत झाली असती. मात्र आता तसे काहीही नाही, ते आज व्यवस्थित चालले, बोलले.
https://twitter.com/PTI_News/status/1880152523329482789
पुढे त्यांनी सांगितले, त्याला सक्त विश्रांतीची गरज असल्याने तसा सल्ला दिला गेला आहे. त्यांच्या पाठीवरच्या जखमेमुळे त्याला इन्फेक्शन होण्याचा धोका आहे. पाठीतून जे पाणी येत होते तेदेखील आता बंद झाले आहे. पण, लवकर बरं होण्यासाठी त्यांना जास्त हालचाली न करण्याचा सल्ला दिला आहे.
पुढे पॅरालेलीस होऊ शकतो का असे विचारले असता डॉक्टर म्हणाले की ‘असे काही अजून झालेले नाही आहे. त्यामुळे देवाची कृपा आहे. त्याशिवाय सैफवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. जर तो ठीक झाला तर आम्ही त्याला २-३ दिवसात डिस्चार्ज देऊ. तर ठीक होण्यासाठी त्याला १ आठवडा लागू शकतो.’
नेमके काय घडले होते?
सैफ अली खानच्या घरात हल्लेखोराने मागच्या बाजूने प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिले आणि आरडाओरडा सुरू केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिले आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा