Wednesday, September 2, 2026
HomeनाशिकNashik News: गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सायखेडा, चांदोरी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

Nashik News: गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सायखेडा, चांदोरी गावांना पुराच्या पाण्याचा वेढा

चांदोरी | वार्ताहर
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सायखेड्याच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे सायखेडा, चांदोरी गावात पाणी शिरले आहे. दारणा व गोदावरी नदीच्या धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, चांदोरी, सायखेडा आणि गोदाकाठावरील अनेक गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान

यंदाच्या पावसाळ्यात गोदावरी नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. चांदोरी येथील ऐतिहासिक खंडेराव मंदिराला पुराच्या पाण्याने पूर्ण वेढा घातला आहे. गोदावरी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे नदीकाठच्या शेतजमिनींमध्येही पाणी शिरले आहे. काही ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. नदीचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसिलदार विशाल नाईकवाडे यांनी परिस्थितीचा आढावा घेत संबंधित विभागांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

ताज्या बातम्या

सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीला एक वर्षाची मुदतवाढ

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पारंपरिक तेलघाणा व्यावसायिक, सर्वसामान्य नागरिक तसेच हातावर पोट असणारे व्यक्तींना दिलासा देत राज्य सरकारने मंगळवारी सुट्ट्या खाद्यतेलाच्या विक्रीला आणखी एक वर्षाची...