Saturday, September 26, 2026
HomeनाशिकNashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं...

Nashik News: गोदावरीला पुराचा वेढा! पंचवटी व भांडी बाजारात पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान

नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मुख्य गंगापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचा पाणीसाठा ९२ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे प्रशासनाकडून धरणातून पाण्याचा वेगाने वाढवण्यात आला आहे. परिणामी, गोदावरी नदीला मोठा पूर आला असून नदीपात्रासह पंचवटी परिसरात पुराच्या पाणी पोहोचले आहे.

प्रशासनाने काल दिलेल्या सूचनेपेक्षा प्रत्यक्ष पाण्याचा विसर्ग अचानक आणि अधिक प्रमाणात वाढवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे पंचवटी आणि गोदाकाठा लगत असलेल्या भांडी बाजार परिसरात पुराचे पाणी शिरले. दुकानांमध्ये आणि आजूबाजूच्या घरात पाणी गेल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली.

- Advertisement -

Nashik News: गंगापूरसह धरणांचा विसर्ग वाढला; नांदूरमध्यमेश्वरमधून सर्वाधिक ८२ हजार क्युसेक

व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान
भांडी बाजारातील दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे दुकानदारांच्या मालाचे आणि साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास पुरेसा वेळही मिळाला नाही, अशी खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन पूर्णपणे तैनात आहे.

ताज्या बातम्या