Sunday, October 27, 2024
Homeनगरसाकुरीहून अपघात करुन आलेल्या कारने नांदूर्खीत मुलाला उडविले

साकुरीहून अपघात करुन आलेल्या कारने नांदूर्खीत मुलाला उडविले

नांदूर्खी |वार्ताहर| Nandurkhi

राहाता तालुक्यातील साकुरी या गावात अपघात झालेल्या स्विफ्ट कारने नांदुर्खी येथे एका शाळकरी मुलाला जोराची धडक दिल्याने तो मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

अपघातात जखमी साकुरी येथील संस्थान कर्मचारी रोहोम यांचा एकुलता एक मुलगा आहे. या कारने जोराची धडक देऊन सदर चालक नांदूर्खी चौकात ही दोन मोटारसायकलस्वारांना कट मारीत होता. तो शिर्डीच्या दिशेने पुन्हा सुसाट वेगाने गाडी वाकडी तिकडी चालवत असतानाच राजेंद्र दाभाडे यांच्या रोड लगत असलेल्या वस्तीवरही तो येऊन धडकला. मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

प्रथमदर्शी पाहणार्‍या नागरिकांनी सांगितले की सदर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा प्रकार झाला आहे. सदर घटनेची माहिती काही नागरिकांनी शिर्डी पोलिसांना दिली. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. वाहकाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप बालकाला अपघाताला सामोरे जावे लागले आहे. अशा सुसाट वाहन चालकावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

माहिती देण्यास पोलिसाची टाळाटाळ

आमच्या प्रतिनिधींनी शिर्डी पोलिस कॉन्स्टेबल श्री. माघाडे यांच्याशी अपघाताची माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता अपघात घडला आहे. अपघातातील जखमीवर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत. मात्र तुम्हाला अधिक माहिती असल्यास तुम्ही अपघातस्थळी जाऊन स्थानिक नागरिकांकडून माहिती घ्या, असे उडवा-उडवीचे उत्तर देऊन माहीती देण्यास टाळाटाळ केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या