Friday, May 3, 2024
Homeनगरसलाबतपूर येथे कत्तलीसाठी आणलेली 16 गोवंश जनावरे पकडली

सलाबतपूर येथे कत्तलीसाठी आणलेली 16 गोवंश जनावरे पकडली

सलाबतपूर |वार्ताहर| Salabatpur

कत्तलीच्या उद्देशाने पिकअप जिपमधून वाहतूक करुन आणून घरासमोर भुकेल्या व तहानलेल्या अवस्थेत सुमारे सव्वाचार लाख रुपये किंमतीची 16 गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची घटना नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) सलाबतपूर (Salabatpur) येथे घडली असून याबाबत नेवासा पोलिसांनी छापा (Newasa Police Raid) टाकून जनावरांची सुटका (Release of Animals) केली व एकावर गुन्हा दाखल केला. सुटका केलेल्या जनावरांमध्ये एक गाय, 2 बैल व 2 महिने ते अडीच वर्षे वयादरम्यानच्या 13 गोर्‍ह्यांचा समावेश आहे.

- Advertisement -

याबाबत शाहजाद महंमद शेख (वय 23) रा. गिडेगाव रोड, सलाबतपूर ता. नेवासा याच्यावर गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रामदास लक्ष्मण घेरे (वय 29) यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 12 जून रोजी दुपारी मी व सहायक फौजदार एस. जी. ससाणे असे नेवासा पोलीस ठाण्यात हजर असताना उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी मला व एस. जी. ससाणे, पोलीस नाईक केदार, कॉन्स्टेबल गलधर, चालक कॉन्स्टेबल कुर्‍हाडे अशांना त्यांचे ऑफिसमध्ये बोलावून कळविले की, नगरच्या कंट्रोलरुम मधून फोन आला की सलाबतपूर येथील शाहजाद महंमद शेख नगरहून पिकअपमधून गोवंश जनावरे घेवून आला आहे.

त्यानंतर आम्ही लगेच सव्वादोन वाजता सलाबतपूर येथे शाहजाद शेख याच्या घरासमोर पोहचलो असता सदर ठिकाणी घराचे आसपास गोवंश जातीची जनावरे भुकेल्या अवस्थेत करकचुन दाव्याने बांधलेली दिसली. सदर जनावरा जवळ एक इसम उभा होता. आम्ही त्यास हटकताच तो पळून गेला. त्याचे नावाबाबत खात्री करता त्याचे नाव शाहजाद महंमद शेख (वय 23 वर्षे) रा.गिडेगांव रोड, सलाबतपूर असे असल्याचे व सदरचे घर त्याचेच असल्याचे समजले.

सदर ठिकाणी पुढील जनावरे मिळून आली. 4 हजार रुपये किंमतीचा एक दिड वर्षे वयाचा काळे पांढरे रंगाचा जर्सी गोर्‍हा, 10 हजार रुपये किंमतीची एक दहा वर्षे वयाची तांबड्या-पांढर्‍या रंगाची पुढे शिंगे असणारी गाय, 3 हजार रुपये किंमतीचा दिड वर्षे वयाचा काळे पांढरे रंगाचा गोर्‍हा, 5 हजार रुपये किंमतीचा एक काळे रंगाचा पांढरी शेपुट असलेला गोर्‍हा, 5 हजार रुपये किंमतीचा अडीच वर्षे वयाचा तांबड्या रंगाचा गोर्‍हा, 2 हजार रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा काळया पांढर्‍या रंगाचा गोर्‍हा, 15 हजार रुपये किंमतीचा दोन वर्ष वयाचा पांढरा रंगाचा गोर्‍हा, 13 हजार रुपये किंमतीचा काळे रंगाचा गळयाजवळ पांढरे ठिपके असलेला गोर्‍हा, 7 हजार रुपये किंमतीचा 9 महीने वयाचा काळे पांढरे रंगाचा गोर्‍हा, 5 हजार 500 रुपये किंमतीचा 6 महीने वयाचा काळे रंगाचा गोर्‍हा, 2 हजार 500 रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा तांबडा भुरका रंगाचा गोर्‍हा, 3 हजार रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा एक काळे पांढरे रंगाचा गोर्‍हा, 3 हजार रुपये किंमतीचा 6 महिने वयाचा एक काळे पांढरे रंगाचा गोर्‍हा, 20 हजार रुपये किंमतीचा 5 वर्ष वयाचा एक पांढरे रंगाचा वाकड्या शिंगाचा बैल, 20 हजार रुपये किंमतीचा 5 वर्षे वयाचा पांढरे रंगाचा वाकड्या शिंगाचा बैल, 3 हजार रुपये किंमतीचा पांढरे काळे रंगाचा 2 महीने वयाचा गोर्‍हा, 3 लाख रुपये किंमतीचा एक पांढरे रंगाची पिकअप जिप (एमएच 17 एजी 3337) अशी एकूण 4 लाख 21 हजार रुपये किंमतीचे गोवंश जातीची जनावरे व वाहतुकीची जीप मिळून आली.

सोबत आणलेल्या पंचासमक्ष उपनिरीक्षक समाधान भाटेवाल यांनी पंचनामा करून ताब्यात घेतली. सदर जनावरे गोकुळधाम गोशाळा गंगापूर जि. ओरंगाबाद यांना लेखी पत्र देवून सांभाळ करुन सुरक्षीत ठेवण्यासाठी जमा केली. या फिर्यादीवरून शाहजाद महंमद शेख (वय 23) रा. गिडेगांव रोड, सलाबतपूर याचे विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात प्राण्यास निर्दयपणे वागविण्याचा अधिनियम 1960 चे कलम 11 (1) (एच) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व सुधारणा अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) व 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या