Saturday, July 27, 2024
Homeक्राईमFiring Case: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या

Firing Case: अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या आरोपीची तुरुंगात आत्महत्या

मुंबई | Mumbai
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने तुरुंगात आत्महत्या केली आहे. या आरोपीचे नाव अनुज थापन असे आहे. अनुजने कोठडीमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याला उपचरासाठी मुंबईतील जीटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंटवर बिष्णोई गँगने गोळीबार केला होता. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने आज आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील ४ आरोपींविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली. विकी गुप्ता, सागर पाल आणि अनुप थापन, अशी या आरोपींची नावे असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यातील अनुप थापनने आज पोलीस आयुक्तांच्या कार्यालयातील लॉकअपमध्ये आत्महत्या केली.

- Advertisement -

सलमानच्या घरावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना अनुजने शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप होता. अनुजवर खंडणी, शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपींना जिवंत काडतुसे आणि दोन पिस्तुले पुरवल्याप्रकरणी सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन यांना पोलिसांनी दक्षिण पंजाबमधून अटक केली होती. हे दोघेही बिष्णोई टोळीशी संबंधित असून थापन ट्रकवर मदतनीस म्हणून कामाला होता. गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके तयार करून गुजरात येथून गोळीबार करणाऱ्या दोन प्रमुख आरोपींना अटक केली होती. गोळीबार करण्यासाठी वापरलेली २ पिस्तूलं आणि सुमारे १७ काडतुसे पोलिसांनी पाणबुड्यांच्या साह्याने सुरतजवळ तापी नदीतून शोधून काढली.

काय आहे प्रकरण?
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या सलमान खानच्या गॅलेक्स येथील निवासस्थानाबाहेर १४ एप्रिल २०२४ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी सलमान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या दिशेने ५ गोळ्या झाडल्या. यापैकी २ गोळ्या इमारतीच्या भिंतीला लागल्या होत्या. या हल्ल्यानंतर सलमानची तसेच त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे १६ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधील भूज जिल्ह्यातून सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केली. त्यानंतर या आरोपींच्या चौकशीमध्ये त्यांना शस्त्रे पुरवाणाऱ्या २ आरोपींना अटक करण्यात आली. याच दोन आरोपींपैकी एकाने आत्महत्या केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या