Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSambhaji Bhide : संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; शरद पवार हे राष्ट्रद्रोही…!

Sambhaji Bhide : संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; शरद पवार हे राष्ट्रद्रोही…!

मुंबई | Mumbai

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे अनेकदा वादग्रस्त विधानामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. संभाजी भिडे यांची वादग्रस्त विधाने नेहमीच चर्चेत राहिली आहेत. भिडे यांनी पुन्हा एकदा राजकीय वक्तव्य केल्याने नवा वाद उद्भवला आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे राष्ट्रद्रोही आहेत, असं वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केले आहे. तसेच शरद पवारांबद्दल आणखी आक्षेपार्ह, वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement) केल्याने त्यांच्यावर टीका (Criticism) होत आहे. राजकीय वर्तुळातून या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत असून सत्ताधारी पक्षाचे नेते सावध, संयमी भूमिका घेत प्रतिक्रिया देणे टाळत असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे कर्जत (Karjat) शहरात आले होते. त्यांचा दौरा हा लोहगड, भीमगड आणि भिवगड या ऐतिहासिक किल्ल्यांच्या अभियानासाठी होता. या वेळी ते स्थानिक लोकांशी बोलत असताना, राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर कठोर शब्दांत हल्ला चढवला. यावेळी त्यांनी पवारांना देशाच्या विरोधात काम करणारे म्हणून हिणवले. शरद पवार (Sharad Pawar) यांना महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण देशासाठी एक प्रकारची हानीकारक कीड म्हणून वर्णन केले. ते म्हणाले की, अशी कीड राज्याराज्यात पसरली आहे आणि ती काढून टाकण्याची गरज असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे.

YouTube video player

ताज्या बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या, थेट सरकारी...

0
मुंबई । Mumbai राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर...