Saturday, September 12, 2026
Homeमहाराष्ट्रएमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

एमपीएससीविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक; सचिव महेंद्र हरपाळकरांच्या तोंडाला फासले काळे

मुंबई | Mumbai
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गैरकारभारावरुन राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. औषध निरीक्षक भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी, परीक्षांमधील गैरप्रकार आणि भरती प्रक्रियेतील अनियमिततेच्या मुद्द्यावरून राज्यात आंदोलनाची तीव्रता वाढत असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासून निषेध व्यक्त केल्याची घटना शुक्रवारी (११ सप्टेंबर) घडली.

MPSC ची कथित पेपरफुटी आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी यामुळे या परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आधीच त्रासले आहेत. ज्यामुळे आता या विद्यार्थ्यांचा रोष पाहायला मिळत असून राज्यातील पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व नाशिक या ठिकाणी आंदोलन झाले आहे. आज शुक्रवारी (11 सप्टेंबर) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळे फासल्याची घटना नवी मुंबई येथील एमपीएससीच्या मुख्य कार्यालयात घडली आहे. सचिव हरपाळकर यांच्या तोंडावर काळे फासल्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

- Advertisement -

MPSC औषधं निरीक्षक पेपरफुटी संदर्भात संभाजी ब्रिगेड ने ३ ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले होते. त्याच वेळी सरकारला आम्ही इशारा दिला होता मात्र सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे त्यांना ज्या भाषेत समजत त्या भाषेत सांगितलं पाहिजे म्हणून ही संभाजी ब्रिगेड ची प्रतिक्रिया आहे. MPSC चे अध्यक्ष व सचिव यांनी तत्काळ राजीनामा दिला नाही तर पुढचा नंबर हा MPSC अध्यक्षांचा असेल यात तिळमात्र शंका नाही, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर येणार, संपुर्ण जगाचे लक्ष दिल्लीवर; परिषदेत नेमकं काय ठरणार?

MPSC चा अभ्यास करणाऱ्या २५ लाख विद्यार्थ्यांच्या व महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेड ने या भ्रष्ट व्यवस्थेच्या आणि निष्क्रिय सरकारच्या तोंडाला काळे फासले आहे. महेंद्र हरपाळकर यांच्याविरोधातील आंदोलन हे सरकारला जनतेच्या वतीने संभाजी ब्रिगेडने मारलेली थप्पड असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik News : शाळेच्या बसला अपघात

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पडसाद मूकबधिर विद्यालयाच्या बसचे अचानक ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने शनिवारी (दि. १२) दुपारी पंचवटीतील गोदाघाट परिसरात अपघात झाला. चालक...