Monday, October 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर येणार,...

BRICKS Summit 2026: BRICSचा महासंगम! मोदी, पुतीन, शी जिनपिंग एकाच मंचावर येणार, संपुर्ण जगाचे लक्ष दिल्लीवर; परिषदेत नेमकं काय ठरणार?

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताच्या अध्यक्षतेखाली १८वी BRICS शिखर परिषद (18th BRICKS Summit 2026) १२ आणि १३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम (Bharat Mandapam) येथे होणार आहे. या परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping), रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin), इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन(Dr. Masoud Pezeshkian), दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख दिल्लीत दाखल होत आहेत.

भारत यंदा चौथ्यांदा BRICSचे अध्यक्षपद भूषवत आहे. यंदाच्या अध्यक्षपदासाठी “Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability” हे घोषवाक्य असून, त्यामागे भारताची ‘Humanity First’ ही भूमिका आहे.

- Advertisement -

भारतासाठी BRICS महत्वाची
रशिया-युक्रेन युद्ध आणि अमेरिका-इराण युद्ध यामुळे सध्याच्या काळातील बदलेले जागतिक राजकारण आणि त्यामुळे जागतिक व्यापारावर होणारा परिणाम या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली ही १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद महत्त्वाची मानली जात आहे. १२-१३ सप्टेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीत ‘भारत मंडपम’ येथे या शिखर परिषदे होणार आहे. या परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. या परिषदेला ब्रिक्सचे सदस्य आणि भागीदार देशांचे नेते उपस्थित राहतील.

BRICS म्हणजे नेमकं काय?
BRICS हा सुरुवातीला ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या चार देशांचा आर्थिक गट होता. दक्षिण आफ्रिकेच्या सहभागानंतर त्याला BRICS हे नाव मिळाले. २०२४ आणि २०२५ मधील विस्तारानंतर आता या गटात ११ सदस्य देश आहेत.

सध्या BRICSमध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, संयुक्त अरब अमिराती, इंडोनेशिया आणि सौदी अरेबिया यांचा समावेश आहे. भारत सरकारच्या माहितीनुसार हे देश मिळून जगाच्या सुमारे ४९.५ टक्के लोकसंख्येचे, ४० टक्के GDPचे आणि २६ टक्के जागतिक व्यापाराचे प्रतिनिधित्व करतात.

तुकाराम मुंढेना MPSC आयोगाच्या अध्यपदी नियुक्त करा, रोहित पवारांची मागणी

मात्र, सौदी अरेबियाच्या पूर्ण सदस्यत्वाच्या भूमिकेबाबत आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अद्याप काहीशी संदिग्धता आहे. त्यामुळे परिषदेत त्याचे प्रतिनिधित्व आणि सहभाग स्वतंत्रपणे पाहावा लागणार आहे.

पुतीन दिल्लीत दाखल
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ११ सप्टेंबर रोजी दिल्लीत दाखल झाले आहेत. BRICS परिषदेसोबतच ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संरक्षण, तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोदी-शी जिनपिंग भेटीकडे सर्वांचे लक्ष
या परिषदेत सर्वाधिक चर्चेत असलेली भेट म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची संभाव्य द्विपक्षीय बैठक. शी जिनपिंग यांचा भारत दौरा जवळपास सात वर्षांनंतर होत असल्याने या भेटीकडे विशेष लक्ष आहे. दोन्ही देशांमधील संबंध, सीमेवरील परिस्थिती, व्यापार आणि आर्थिक सहकार्य यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

ब्रिक्समध्ये या मुद्द्यांवर होणार चर्चा
सहकार्य व जागतिक हवामान बदल अशा विविध मुद्यांवर या परिषदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच, अमेरिका-इराण युद्धजन्य परिस्थिती, रशिया-युक्रेन युध्द, अन्न आणि उर्जा सुरक्षा, पुरवठा साखळी मजबूत करणे, व्यापार आणि गुंतवणूक, डिजिटल अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान, आरोग्य अन् आपत्ती व्यवस्थापन, डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासोबतच अन्य विषयांवर चर्चा होणार आहे. भारत जागतिक मंचावर आपलं स्थान वाढवण्यासाठी बहुपक्षीय मंचांचा वापर करत आहे. अनेक व्यासपीठांद्वारे भारत जागतिक स्तरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. त्यामुळे ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व करण्याची संधी यावेळी भारताकडे असल्याने याकडे जगाचं लक्ष लागलं आहे.

ताज्या बातम्या

२०२६ चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; तीन वैज्ञानिकांचा गौरव

0
दिल्ली । Delhi मानवी शरीरातील सर्वात गुंतागुंतीचा आणि गूढ अवयव म्हणजे 'मेंदू'. या मेंदूतील अब्जावधी चेतापेशींचे कार्य कसे चालते, त्या एकमेकांशी कसा संवाद साधतात आणि...